Kashedi Ghat Road Repair: जुन्या कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याचे होणार काँकिटीकरण

मुंबई–गोवा महामार्गावरील 105 फूट खचलेल्या रस्त्याची टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने दुरुस्ती; कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरल्यावर अखेर कायमस्वरूपी उपाययोजना
Kashedi Ghat Road Repair
Kashedi Ghat Road RepairPudhari
Published on
Updated on

पोलादपूर शहर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या मार्गावर सन 2005 च्या अतिवृष्टी मध्ये 105 फूट लांब खचलेला रस्ता या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून सातत्याने रस्ता खचण्याचे ग्रहण सुटता सुटेना मात्र यावर्षी या रस्त्यावर काँक्रिटीकरण करून टेक्नॉलॉजीचा वापर करत रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या वीस वर्षाचे ग्रहण सुटणार अशी भावना व्यक्त केली जात आहे. या कामाला महामार्ग प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.

Kashedi Ghat Road Repair
Vijay Mallya High Court: भारतात परतण्याचा हेतू आहे की, नाही; आम्ही शेवटची संधी देतोय; विजय मल्ल्या यांना हायकोर्टाचा इशारा

या रस्त्यावर सदर काम जय भारत कंपनी मुंबई यांचे मार्फत दरीच्या बाजूकडून सुमारे 100 मीटर लांब व 15 फूट उंच काँक्रीटची भिंत बांधण्यात येणार असून 6 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्याची उपाययोजना आखण्यात आली आहे याबरोबरच डोंगर भागाकडून कातळाच्या बाजूने या ठिकाणी पावसाचे मुरणारे पाणी योग्य पद्धतीने नियोजन करून गटार काढण्यात येणार असून त्यामुळे दरवर्षी रस्ता खचण्याच्या या वारंवार होणाऱ्या घटना टळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Kashedi Ghat Road Repair
Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय : 304 परीक्षा कायमस्वरूपी बंद

कोट्यवधी खर्चून रस्ता खचला

सन 2005 पासून आजतागायत या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य आणि दरडी कोसळण्याचे धोका कायम राहिला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालक स्थानिक नागरिक यांच्यातून नेहमीच नाराजीचा सूर उमटत होता. या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत डागडूजी केले जात होती मात्र रस्ता खचण्याचे ग्रहण कायम राहिले होते. दरम्यान आता सुरू झालेल्या या कामामुळे प्रवासी जनता आणि वाहन चालकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news