Karjat Hotel Action: कर्जतमध्ये अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई; आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे ठाकरे हॉटेलला लावले टाळे

तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Karjat Hotel Action
Karjat Hotel ActionPudhari
Published on
Updated on

नेरळ: राज्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने कर्जत शहरातील प्रसिद्ध ठाकरे हॉटेल बंद करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

Karjat Hotel Action
Raigad Kerosene Distribution: गॅस सिलिंडर टंचाईने रेशनला आलाय भाव; रायगडसाठी १२० किलो लिटर रॉकेल मंजूर

अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार प्रत्येक अन्न व्यवसायिकाकडे वैध नोंदणी अथवा परवाना, स्वच्छतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान ठाकरे हॉटेलकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली.

याच मोहिमेत कर्जत शहरातील आमराई रस्त्यालगत असलेल्या कृष्णा स्वीट मार्ट येथेही पथकाने अचानक भेट देत खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Karjat Hotel Action
Navi Mumbai News: मत्स्यबंदी असतानाही प्रवासी बोटी सुरूच

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यात गुटखा विक्रीविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली होती. विविध टपऱ्यांवर धाडी टाकून मोठा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील स्वच्छता आणि परवाना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कर्जत परिसरात आमचे पथक सातत्याने तपासणी करत आहे. ठाकरे हॉटेलकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने कारवाई करण्यात आली असून, संबंधितांनी दंड भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीनेच हॉटेल पुन्हा सुरू करता येईल.

- प्रशांत शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news