Raigad Crime : फार्महाऊसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

कर्जत पोलिसांची कारवाई; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
Raigad Crime
Raigad Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फार्म हाऊस आणि घरफोडीच्या घटनांमधून इन्व्हर्टर, बॅटरी, टीव्ही, वॉशिंग मशीन, बोअरिंग पंप तसेच लोखंडी पाइप चोरणाऱ्या दोन संशयितांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. सहा वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.

सप्टेंबर २०२६ मध्ये दाखल झालेल्या कर्जत पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३६७ आणि ३६८ या सहा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना यश आले. गोपनीय माहितीच्या आधारे सुबवे येथील तुषार चवळे आणि राहुल पेमारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी संगनमताने कशेळे परिसरातील विविध फार्म हाऊस, घरांमध्ये तसेच बांधकामासाठी आणून ठेवलेल्या साहित्याची चोरी केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Raigad Crime
Raigad District Development Plan : रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींची तरतूद

या चोऱ्यांमध्ये बोअरिंगची मोटर, वॉशिंग मशीन, ३२ इंची टीव्ही, चार बॅटरी, चार इन्व्हर्टर, मोटारसायकल आणि १८ जीआय लोखंडी पाइप यांचा समावेश आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कशेळे दूरक्षेत्रातील हवालदार लालासाहेब तोरवे, कॉन्स्टेबल राहुल जाधव, गुन्हे प्रकटीकरण कक्षातील केशव नागरगोजे, समीर भोईर, स्वप्निल येरुनकर, सतीश पाटील, योगेश गर्जे ऋतिक गोऱ्हाणे, आणि घुले यांनी तपासात सहभाग घेतला.

Raigad Crime
Maharashtra Contractors Pending Payments : राज्यात कंत्राटदारांची ८६ हजार कोटींची देयके प्रलंबित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news