Karjat Bike Accident: मोकाट गायीला धडकून दुचाकीचा अपघात; बाप जागीच ठार

मुलगा गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील कशेळे-वाकडी पुलानजिकची घटना
Karjat Bike Accident
Karjat Bike AccidentPudhari
Published on
Updated on

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाथरज भागातील खोंड्याची वाडीत रहाणार बाप लेक हे मोटारसायकल वरून कर्जत दिशेने घरी परतत असताना, कशेळे येथील वाकडी पूलाच्या वळणावरती अचानकपणे मोकाट गायमध्ये आल्याने, मोटारसायकल ही गायीला धडकून आपघाताची घटना घडली आहे.

Karjat Bike Accident
Maharashtra Board Exam: बोर्ड परीक्षांतील ‘मास कॉपी’ प्रकरणी 81 शिक्षक-कर्मचारी निलंबित; शिक्षण विभागाची कडक कारवाई

या अपघातामध्ये वडीलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गायीचा देखील जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत-कशेळ मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरून पाथरज भागातील खोंड्याची वाडी येथील राहाणार मालु लक्ष्मण ढोले, वय वर्ष 42 हे त्यांचा मुलगा हरिश्चंद्र मालु ढोले, वय वर्ष 27 याच्यासह डबलसीट मोटारसायकवरून 7 मार्च 2026 रोजी

Karjat Bike Accident
ITI Digital Library: राज्यातील चार आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी उभारणार; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातून शिक्षण

संध्याकाळचे सुमारास कर्जतकडून पाथरज येथील खोंडेवाडी येथील घरी परतत असताना, सुमारे पावणेसहाचे सुमारास आंबीवली फाट्याजवळ निसर्ग हॉटेल जवळ येथील वाकडी पुलाचे वळणावर आले असता, अचानकपणे रस्त्यावर फिरत असलेली मोकाट गाय ही मध्ये आल्याने, त्या गाईला जोरदार धडक बसली. त्यांच्या मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घटली आहे.

Karjat Bike Accident
CBSE Exam: मध्यपूर्वेतील तणावाचा परीक्षांवर परिणाम; सीबीएसईने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

या अपघातामध्ये मोटारसायकलवरील वडील मालु लक्ष्मण ढोले, वय वर्ष 42 यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा हरिश्चंद्र मालु ढोले, वय वर्ष 27 हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याने, त्याला उपचाराकरीता पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातामध्ये मोटारसायकलच्या धडकेमध्ये आलेल्या गाईचा देखील जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लालासाहेब तोरवे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news