CBSE Exam: मध्यपूर्वेतील तणावाचा परीक्षांवर परिणाम; सीबीएसईने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

बहरीन, कुवेत, कतारसह 7 देशांतील भारतीय शाळांमध्ये 9 ते 11 मार्चच्या परीक्षा स्थगित; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
CBSE Middle East Exam
CBSE Middle East ExamPudhari
Published on
Updated on

मुंबई : मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE Middle East Exam
BMC Teachers: मुंबई पालिकेच्या 18 शिक्षिका 18 वर्षे फक्त 5 हजार मानधनावर; प्रशासनाच्या धोरणावर प्रश्न

परिणामी बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांमधील सीबीएसई संलग्न शाळांमध्ये 9, 10 आणि 11 मार्च 2026 रोजी होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मध्यपूर्वेतील या देशांमध्ये सीबीएसईशी संलग्न अनेक भारतीय शाळा कार्यरत असून त्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE Middle East Exam
Konkan Alphonso Export: इराण-इस्रायल युद्धाचा कोकण हापूसवर परिणाम; निर्यात ठप्प होण्याची भीती

या संदर्भातील सूचना संबंधित देशांतील संलग्न शाळांना पाठवण्यात आल्या असून 10 मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 12 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षांबाबत पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सीबीएसईने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांशी सातत्याने संपर्कात राहावे आणि मंडळाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुढील निर्णय घेतले जातील, असेही मंडळाने नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news