

पनवेल : विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत महापालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे.
मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा तर एक अपक्ष आशा सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी 71 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये 53 जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण 59 जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर सरस ठरले आहेत.
त्यासोबत महाविकास आघाडीमधील शेतकरी कामगार पक्षाने केवळ 9 जागा जिंकत आपले अस्तिव टिकवण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. त्यासोबत काँग्रेसने 4, शिवसेना उबाठाने 5 जागा जिंकल्या आहेत. महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजीत दादा गटाला दोन-दोन जागा मिळवण्यात यश आले आहे.
भाजपने ही निवडणूक पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली. आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजप महायुतीने नियोजनबद्ध व संघटित प्रचार केला. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात महायुती यशस्वी ठरली.
सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
शेकाप महाविकास आघाडीने प्रचारात फक्त टीका आणि फेक नेरेटिव्ह पसरवले होते. तर भाजप महायुती केलेल्या कामाचा आढावा मांडून लोकांपुढे जात होती. त्यामुळे यावेळीही सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला नाही आणि त्याचा परिपाक म्हणून भाजप महायुतीने मोठा विजय मिळवला.
मशालीने भाजपसह विरोधकांना फोडला घाम
यंदाचा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मशाल चिन्ह घेऊन यंदा निवडणूक रिंगणात उतरले होते त्यापैकी पाच उबाठाच्या उमेदवारांना विजय मिळवता आला आहे तर अन्य सहा ते सात उमेदवारांना निसारटा पराभव पत्करावा लागला. मशाल चिन्ह घेऊन उमेवार झालेल्या प्रत्येक उमेदवारांनी जवळपास तीन हजार मतदान मिळवत भाजप उमेदवाराला चांगला घाम फोडला होता. प्रभाग 11 मधील समाधान काशीद यांनी 5 हजार 466 मत मिळवून भाजप उमेदवाराला धक्का दिला होता, मात्र भाजप उमेदवाराला 1 हजार 422 मते जास्त मिळाल्याने उमेदवार जिंकला.
पनवेल महानगरपालिका विजयी उमेदवार
बिनविरोध नगरसेवक - नितीन जयराम पाटील (प्रभाग 18), ममता प्रितम म्हात्रे (प्रभाग 18), दर्शना भगवान भोईर (प्रभाग 19),
रुचिता गुरुनाथ लोंढे (प्रभाग 19), अजय तुकाराम बहिरा (प्रभाग 20), प्रियांका तेजस कांडपिळे (प्रभाग 20)
भाजप विजयी उमेदवार
प्रभाग 01- संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण पाटील
प्रभाग 04- प्रवीण काळुराम पाटील, परेशा ब्रिजेश पटेल, अनिता वासुदेव पाटील, मधू पाटील
प्रभाग 05 - शत्रुघ्न अंबाजी काकडे, मिनल विजय पाटील
प्रभाग 06 - उषा अजित अडसुळे, नरेश गणपत ठाकूर, सोनल कीर्ती नवघरे, समीर चंद्रकांत कदम
प्रभाग 07- अमर अरुण पाटील, प्रमिला रविनाथ पाटील, मनाली अमर ठाकूर, राजेंद्रकुमार शर्मा
प्रभाग 08-बबन नामदेव मुकादम, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक, रामदास वामन शेवाळे
प्रभाग 09- महादेव जोमा मधे, प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शनिवार शेळके
प्रभाग 10-रविंद्र अनंत भगत, सरस्वती नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय मनोहर खानावकर
प्रभाग 11- प्रदीप गजानन भगत, हॅप्पी सिंग
प्रभाग 12-कुसुम रवींद्र म्हात्रे, दिलीप बाळाराम पाटील
प्रभाग 13- हेमलता गोवारी, शिला भाऊ भगत, विकास नारायण घरत, रविंद्र गणपत जोशी
प्रभाग 15 - एकनाथ रामदास गायकवाड, सीता सदानंद पाटील, कुसुम गणेश पाटील, दशरथ बाळू म्हात्रे
प्रभाग 16 -राजेश्री महेंद्र वावेकर, कविता किशोर चौतमोल, समीर बाळशेठ ठाकूर, संतोष गुन्डाप्पा शेट्टी
प्रभाग 17-प्रकाश चंदर बिनेदार, अस्मिता जगदीश घरत, शिवानी सुनिल घरत, मनोज भुजबळ
प्रभाग 18-प्रिती जॉन्सन जॉर्ज
प्रभाग 19-सुमित उल्हास झुंझारराव, चंद्रकांत (राजू ) सोनी
प्रभाग 20 - श्वेता सुनिल बहिरा
शेकाप विजयी उमेदवार
प्रभाग 1 - जनार्दन पांडूरंग पाटील
प्रभाग 2 - अर्चना योगेश भाईर, योगिता समीर फडके, पुंडलिक अरिविंद म्हात्रे, महादू राम पाटील.
प्रभाग 14- केतन भगत राम, मनिषा अनंत म्हात्रे, आर्या प्रवीण जाधव, लतिफ रऊफ शेख
काँग्रेसचे उमेदवार
प्रभाग 3 : लिला रतन काटकरे, प्रगती कैलास पाटील, तुषार परशुराम पाटील, हरेश मनोहर केनी
राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रभाग 9 - महादेव जोमा मधे
प्रभाग 10- विजय मनोहर खानावकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी उमेदवार
प्रभाग 5 -लिना अर्जुन घरत, उत्तम शिवराम मोर्बेकर,
प्रभाग 11- मेघना संदिप घाडगे
प्रभाग 12- रितिक्षा विनयकुमार गोवारी, प्रिया सुनिल गोवारी
शिवसेना शिंदे गट
प्रभाग 8 - सायली तुकाराम सरक, रामदास वामन शेवाळे