Ganesh Idol: विदेशात बाप्पा जाणार पोस्टाने, मूर्ती पाठवणे झाले सोपे; 'रायगड पोस्टल डिव्हिजन'तर्फे टपाल विभागाची विशेष सेवा

या योजनेअंतर्गत गणेश भक्तांना आणि मूर्तिकारांना विशेष सवलती व सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती रायगड टपाल विभागाचे नितीन पडवळ यांनी दिली आहे.
Ganesh Idol
Ganesh IdolPudhari
Published on
Updated on

रायगड: परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना आणि बाप्पाच्या भक्तांना आता घरगुती गणेशमूर्ती पाठवणे अत्यंत सोपे होणार आहे. भारतीय टपाल विभागाच्या 'रायगड पोस्टल डिव्हिजन'तर्फे परदेशात गणेश मूर्ती पाठवण्यासाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.

'भक्तीचा स्नेह दूरदेशीही पोहोचवूया' या ब्रीदवाक्यासह टपाल कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत गणेश भक्तांना आणि मूर्तिकारांना विशेष सवलती व सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती रायगड टपाल विभागाचे नितीन पडवळ यांनी दिली आहे.

सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये

गणेशमूर्ती सुरक्षितपणे पोहोचण्याची पूर्ण खात्री देत टपाल विभागाने मूर्तीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी विशेष पॅकिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती वेळेवर पोहोचवण्यासाठी विभाग कटिबद्ध असून जगभरातील सर्व प्रमुख देशांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे.

Ganesh Idol
Uran Crime News: पार्ले बिस्कीट अन् पाचशेच्या नोटांच्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक; उरणला ३ लाखांची सोन्याची माळ लांबवली

गणेश मूर्तिकारांसाठी खास ऑफर

स्थानिक मूर्तिकार आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाने विशेष दर, सुलभ प्रक्रिया आणि प्रोफेशनल मदत देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे कोकणातील तसेच जिल्ह्यातील गणेशमूर्ती परदेशात पाठवणे अधिक सुलभ होणार आहे.

Ganesh Idol
Eco Friendly Paper Ganesha: यंदा नेरूळ येथील कागदी गणेशमूर्तींना परदेशातूनही मोठी मागणी

परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना बाप्पाची मूर्ती पाठवण्यासाठी नागरिकांनी व मूर्तिकारांनी जवळच्या टपाल कार्यालयाला भेट देऊन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड पोस्टल विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news