

मुंबई : डोंबिवलीत तब्बल २.५ लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची मोॉक चित्रनिर्मिती सध्या अतिशय लक्षवेधक ठरत आहे. या महाकाय चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती साकारली आहे.
वंदे मातरम या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्याचा डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला. चेतन राऊत तसेच प्रभू कापसे व वैभव कापसे या पितापुत्रांच्या जोडीने आणि अन्य कलाकार-साथीदारांसह सतत नऊ दिवस खपून पणत्या रंगवल्या आणि त्यातून अखंड भारताची माता साकारली.
९५ फूट उंची आणि ७५ फूट रुंदीची, सुमारे अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा (दिव्यांचा) वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझेंक कलाकृती निर्माण करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झाला आहे.