Raw Mango Price: हिरव्यागार गावरान कच्च्या कैऱ्यांनी बाजारफुलला; खवय्यांच्या खरेदीसाठी उड्या, किमतीही वाढल्या

मात्र यंदा अवकाळीचा फटका व प्रतिकूल हवामान यामुळे आवक कमी आहे. परिणामी भाव वाढले आहेत.
Raw Mango Price
Raw Mango PriceOudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागडः गावरान कच्च्या कैऱ्या तसेच आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील बाजारापेठांमध्ये गावरान कैऱ्या व गावरान आंबे विक्रिसाठी आले आहेत. मात्र यंदा अवकाळीचा फटका व प्रतिकूल हवामान यामुळे आवक कमी आहे. परिणामी भाव वाढले आहेत.

मागच्या वर्षी 50 रुपयांना पाच ते सहा कैऱ्या असलेला एक वाटा आता 80 ते शंभर रुपयांना मिळत आहे. तर पिकलेल्या गावरान आंब्याचा भाव डजनाला चारशे ते सहाशे रुपये आहे. भाव वाढले असले तरी या कैऱ्या खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दि करत आहेत.

Raw Mango Price
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीयउड्डाणासाठी सज्ज; देशांतर्गत वाहतुकीने प्रवासी संख्या वाढली

जिल्ह्यातील बहुतांश भागांमधील आंबा कैऱ्या लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी कैऱ्या परिपक्व झाल्या आहेत. आदिवासी महिला, फळ व भाजी विक्रेते या कैऱ्या व आंबे घेऊन बाजारात विक्रीसाठी येत आहेत. काही ठिकाणी किलोने कैऱ्या मिळत आहेत.

स्थानिकांना मिळतोय रोजगार

जंगलात व माळरानावर मिळणाऱ्या या गावरान कैऱ्या आणि आंबे स्थानिक तसेच आदिवासी बांधव तोडून स्थानिक बाजारात विकायला आणतात. या कैऱ्या विकून स्थानिकांना विशेषतः महिलांना चांगला रोजगार देखील मिळतो.

Raw Mango Price
Waste Management Project: नेरळमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दुरवस्था

जेवणाची लज्जत वाढवितात

ताज्या आणि सुक्या मासळीचे कालवण, वरण यामध्ये कैऱ्या टाकल्या जातात. त्यामुळे जेवण रुचकर व लज्जतदार होते. कच्च्या कैऱ्या बारिक कापून मसाला, हळद, तेल आणि मीठ टाकुन खाल्ल्या जातात. या कैऱ्यांचा वापर घरगुती लोणचे तयार करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे घराघरांमध्ये लोणच्याच्या तयारीला सुरुवात झालेली दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news