Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीयउड्डाणासाठी सज्ज; देशांतर्गत वाहतुकीने प्रवासी संख्या वाढली

विमानतळावरून मे 2026पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होत असल्यामुळे उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportPudhari
Published on
Updated on

खारघर: मे महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवेचा विस्तार होणार आहे. विमानतळावरून मे 2026पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होत असल्यामुळे उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मते, यशस्वी देशांतर्गत सेवांनानंतर आता नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही सज्ज झालं आहे.मात्र,अद्यापअधिकृत घोषणा करणे बाकी आहे.

Navi Mumbai Airport
Mumbai Pune missing link: विकासाच्या ‌‘कनेक्टिंग लिंक‌’ मधून कोकण गायब; मिसिंग लिंक सुसाट, मुंबई - गोवा महामार्ग जाम

35 उड्डाणांची शक्यता यापूर्वी 29 मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होणार असल्याची घोषणा केली होती. पण पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.

मग त्यानंतर पुन्हा मे महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सची सुरूवात होणार असे सिडकोने जाहीर केले. यामुळे येत्या महिन्याभरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप यासाठी तारीख जाहीर केली नाही आहे.

Navi Mumbai Airport
TOD scheme: टीओडी सवलतीचा 70 लाख ग्राहकांना 2235 कोटींचा लाभ

दुसऱ्या धावपट्टीचं काम सुरू

डिसेंबर 2025पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना सुरूवात झाली. तेव्हा केवळ देशांतर्गत सेवांना सुरूवात करण्यात आली होती. हळूहळू सेवांचा विस्तार होत असून विमानतळाच्या आजूबाजूने पायाभूत सुविधांचा विकाससुद्धा आता सुरू आहे.

सध्या विमानतळावर केवळ एक धावपट्टी कार्यरत असल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या मर्यादीत असू शकते. पण दुसऱ्या धावपट्टीचंही काम आता वेगाने सुरू आहे. पहिल्या काही महिन्यातील प्रतिसाद लक्षात घेता दुसऱ्या धावपट्टीचं काम सुद्धा सुरू केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news