

महाड ः 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील हाणामारीत फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह पाच आरोपींनी शनिवारी महाड शहर पोलिस ठाण्यात दुपारी दोनच्या सुमारास हजर होवून पोलीसांकडे शरणागती पत्करली. सुशांत जाबरे व त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरू असून उद्या रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल अशी माहिती महाड शहर पोलीसांनी दिली आहे.
शुक्रवारी (काल) या प्रकरणात शिंदे शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांच्यासह एकूण 13 आरोपी पोलिसांसमोर हजर झाले. त्याना महाड न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुशांत जाबरे यांच्यासह अमित शिगवण, व्यंकट मंडला, मोहनिश पाल आणि समीर रेवाळे हे पाचही आरोपी महाड शहर पोलिसांसमोर हजर झाले.
दुपारी महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर संबंधित सर्व आरोपींची सत्वर चौकशी व जाबजबाब घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान महाड मारामारी प्रकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आणि शिंदे शिवसेनेचे 8 असे एकूण 18 अशा सर्व आरोपींना उद्या रविवारी महाड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे महाड शहर पोलीसांनी सांगीतले.
रविवारी न्यायालयात हजर करणार
शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुशांत जाबरे यांच्यासह अमित शिगवण, व्यंकट मंडला, मोहनिश पाल आणि समीर रेवाळे हे पाचही आरोपी महाड शहर पोलिसांसमोर हजर झाले. सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करणार.