Panvel Railway Station Drugs Seized: पनवेल रेल्वे स्थानकावरून तब्बल 35 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन जण ताब्यात

NCB Raid On Panvel Railway Station: अमलीपदार्थ नियंत्रण विभागाची (NCB) मोठी कारवाई
Panvel Railway Station Drugs Seized
Panvel Railway Station Drugs SeizedPudhari
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ३.५ किलोचे ड्रग्स जप्त केले आहे. मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून हे ड्रग्ज शुक्रवारी (दि.१८) सकाळी जप्त करण्यात आले आहे. खाण्याच्या पुड्यामध्ये हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोपनीय माहितीनुसार करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे

Panvel Railway Station Drugs Seized
coastal drug trafficking : ड्रग्ज माफियांची नजर कोकण किनारपट्टीवर

ही कारवाई केल्यानंतर ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या प्रवाशांचा कोणत्या टोळीशी याचा संबंध आहे, तसेच कोणाला अटक झाली आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Panvel Railway Station Drugs Seized
Mahaharashtra Drugs Racket: महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटची Inside Story, कारखाने राज्यात, सूत्रधार पाकिस्तान- दुबईत

पनवेल रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली असून, या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news