Mahaharashtra Drugs Racket: महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटची Inside Story, कारखाने राज्यात, सूत्रधार पाकिस्तान- दुबईत

Synthetic drugs manufacturing in Maharashtra: ड्रग्जनिर्मितीचे कारखाने; पोलिसांपुढे आव्हान
Mahaharashtra Drugs Racket: महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटची Inside Story, कारखाने राज्यात, सूत्रधार पाकिस्तान- दुबईत
Published on
Updated on

Maharashtra Drugs Racket Maharashtra Drugs Case Anti Narcotics cell

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात गेल्या काही दिवसांत नशिल्या आणि अत्यंत घातक अशा ड्रग्जचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा पिढी मोठ्या प्रमाणात या ड्रग्जच्या आहारी जाताना दिसत आहे. ड्रग्ज निर्मितीचे कारखानेच्या कारखाने आढळून येऊ लागले आहेत. या बाबी विचारात घेता हा सगळा प्रकार देशविघातक कारवायांचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ड्रग्जचे कारखाने !

सांगली जिल्ह्यातील कुपवाड, इरळी आणि कार्वे या तीन ठिकाणी अलीकडेच ड्रग्ज निर्मितीचे तीन कारखाने आणि करोडो रुपयांचे ड्रग्ज मिळून आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या चाकण औद्योगिक वसाहतीत ड्रग्ज उत्पादन करणारा एक भला मोठा कारखाना आढळून आला होता. मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातही शेकडो किलो आणि करोडो रुपये किमतीचे ड्रग्जचे साठे आढळून आले होते. सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी, सातारा शहर आणि इस्लामपूर येथेही मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे साठे मिळून आले होते. या सगळ्या बाबी विचारात घेता राज्यातील बहुतांश मोठ्या शहरात आणि ग्रामीण भागालाही ड्रग्जची लागण झाल्याची लक्षणे दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात ड्रग्जचे कारखाने थाटले जात आहेत, तिथल्या स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांनाही त्याचा थांगपत्ता लागू दिला जात नाही.

Mahaharashtra Drugs Racket: महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटची Inside Story, कारखाने राज्यात, सूत्रधार पाकिस्तान- दुबईत
Kalyan Drugs Racket Case: कल्याण- डोंबिवलीतील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन, मंत्र्याच्या निकवर्तीयाला अटक

अंडरवर्ल्ड कनेक्शन !

या सगळ्या ड्रग्जनिर्मिती आणि वितरण व्यवस्थेत मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगारांनी गेल्या काही दिवसांपासून हा नवा धंदा सुरू केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान, दुबई आणि अन्य देशात बसून ही मंडळी या धंद्याची सूत्रे फिरवताना दिसत आहेत.

ड्रग्जचे स्वरूप !

राज्यात फोफावत असलेल्या ड्रग्जचे स्वरूप आणि प्रकारही वेगवेगळे आहेत. नैसर्गिक आणि प्रक्रियाकृत असे ड्रग्जचे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक ड्रग्जमध्ये प्रामुख्याने अफू, चरस आणि गांजा यांचा समावेश होतो. अफू गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमधून तर चरस जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तान व नेपाळमधून येते. गांजासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात गांजाची आगारच्या आगार आढळून येतात. शिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथूनही राज्यात गांजाची तस्करी चालते. गांजा सहजासहजी आणि मुबलक मिळत असल्याने युवापिढी मोठ्या प्रमाणात 'गांजाडू' होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Mahaharashtra Drugs Racket: महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटची Inside Story, कारखाने राज्यात, सूत्रधार पाकिस्तान- दुबईत
Drug Peddling Maharashtra : खुलेआम ड्रग्स विक्रीने मिरा-भाईंदर झालेय बदनाम

हायफाय ड्रग्ज !

प्रक्रियाकृत ड्रग्जमध्ये प्रामुख्याने हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग्ज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या ड्रग्जचा समावेश होतो. या ड्रग्जची काही देशी उगमस्थाने अलीकडे आढळून आली असली तरी प्रामुख्याने त्यांची आयात परदेशातून केली जाते. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप आणि इंजेक्शनच्या रूपात हे अमली पदार्थ मिळतात. उच्चभ्रू वर्गातील अनेक युवक या महागड्या ड्रग्जचा शौक करताना दिसतात.

मॅफेड्रॉनचा फैलाव !

गेल्या काही दिवसांत खेड्या-पाड्यातील युवापिढी मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन या ड्रग्जच्या जास्त आहारी जात असलेली दिसत आहे. प्रामुख्याने परप्रांतीयांकडून मॅफेड्रॉन सहज उपलब्ध होते. महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी, सभासमारंभात कुठेही अनेकजण त्याची चव चाखताना दिसून येतात. याशिवाय मेडिकल दुकानांमधूनही नशिल्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. गुन्हेगारी वर्तुळात या नशिल्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. एकुणच राज्यातील युवापिढीला दिवसेंदिवस ड्रग्जचा विळखा आवळत चाललेला दिसत आहे आणि हे चिंताजनक आहे.

'ही' आहेत ड्रग्जची लक्षणे आणि अवलक्षणे..!!

कोणत्याही ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये जवळपास सारखीच लक्षणे दिसू लागतात. ड्रग्जची चटक लागलेली व्यक्ती सुरुवातीला काही दिवस सतत उत्साही दिसते, पण नंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीची झोप व भूक गायब होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात, कायम चिडचिड, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी, अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येऊन धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे अशी लक्षणे दिसू लागतात.

ड्रग्जच्या आहारी गेलेली व्यक्ती ड्रग्ज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. खिशात पैसे नसतील तर चोरी करतील, मारामारी करतील, खोटे बोलतील, आणखी काही म्हणजे काहीही करतील; पण कधी एकदा ड्रग्ज मिळवून त्याची चव चाखतो, असे त्यांना होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news