Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात डीजे-डॉल्बी व लेझर लाईटला बंदी; खांदेश्वर पोलिसांच्या मंडळांना कडक सूचना

पोलिसांकडून सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली
Ganeshotsav 2026
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात डीजे-डॉल्बी व लेझर लाईटला बंदी; खांदेश्वर पोलिसांच्या मंडळांना कडक सूचनाfile photo
Published on
Updated on

DJ-Dolby and laser light banned in Ganeshotsav; Strict instructions to Khandeshwar police circles

पनवेल विक्रम बाबर ; पुढारी वृत्तसेवा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सव मंडळांनी डीजे, डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर लाईटचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Ganeshotsav 2026
Raigad Dam Water Storage: रायगड जिल्ह्याला जुलैमधील पावसाने तारले; ऑगस्ट महिन्यात कमीच पाऊस तरी २८ धरणांमध्ये ९६ टक्के पाणीसाठा

खांदा कॉलनी सेक्टर ११ येथील खान्देश हॉलमध्ये ४ सप्टेंबर रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सुमारे ५० ते ६० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी मंडळांनी जागा मालक तसेच संबंधित विभागांकडून आवश्यक परवानग्या घेऊनच मंडप उभारावा. राज्य शासनाने मंडप उभारणीबाबत निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे. ऊन, वारा, पाऊस तसेच भटक्या जनावरांपासून गणेशमूर्तीला कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने मंडप व स्टेजची उभारणी करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.

गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर मंडपाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. तसेच मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही सांगण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणतेही आक्षेपार्ह देखावे अथवा फलक लावू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा ठेवाव्यात. गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका शक्यतो रस्त्याच्या एका बाजूने काढाव्यात. मिरवणुकीत गर्दी नियंत्रणासाठी शक्यतो दोरीचा वापर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

Ganeshotsav 2026
Managaon Water Supply Scheme: माणगाव तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांचा बोजवारा

विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी तसेच वाहनचालकाकडे वैध वाहन परवाना आहे की नाही, याची खात्री करावी, असे पोलिसांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगीसाठीचे अर्ज लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले.

दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेल्या २३ गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, उर्वरित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news