Raigad Dam Water Storage: रायगड जिल्ह्याला जुलैमधील पावसाने तारले; ऑगस्ट महिन्यात कमीच पाऊस तरी २८ धरणांमध्ये ९६ टक्के पाणीसाठा

रायगड जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या २८ पैकी २१ धरणे पूर्ण भरली असून प्रकल्पांमध्ये ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलैतील दमदार पावसाने ऑगस्टमधील तूट भरून काढली.
Raigad Dam Water Storage
Raigad Dam Water StoragePudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागड: सुधागडातील उन्हेरे कवेले ढोक शेत घोटावडे कोंडगाव यांचे सह रायगड जिल्ह्यातील धरणे ९५ ते ९६ टक्के भरली आहेत. रायगड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ५९ टक्केच पाऊस झाला असे असले तरी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पडलेल्या पावसाने रायगड जिल्ह्याला तारले आहे.

आतापर्यंत एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या ८५ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाच्या २८ पैकी २१ धरणे पूर्ण पणे भरली आहेत. या प्रकल्पांमधील ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती, मात्र जुलै महिन्यात पावसाने जून महिन्याची कसर भरून काढली. पहिल्या दहा दिवसात विक्रमी पाऊस पडला त्यानंतरही पावसात फारसा खंड पडला नाही.

Raigad Dam Water Storage
Poladpur Hospital: पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रिक्तपदांचे ग्रहण

रायगड जिल्ह्यातील दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीमधील ३ हजार २४८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत जून आणि जुलै या दोन महिन्यात रायगड जिल्ह्यात २ हजार ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६५५ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत यावर्षी ३३५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच सरासरी पावसाच्या तुलनेत ५१ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात १६१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यात भरून निघाली आहे परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट झाली ऑगस्ट महिन्यात रायगड जिल्ह्यात सरासरी ८७४ मिमी पाऊस पडतो. या तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यात ५१८ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात ५९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली आहे. रायगड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्य मान ३ हजार १४८ मिमी आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत रायगड जिल्ह्यात २ हजार ६९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Raigad Dam Water Storage
Mumbai Mega Block: तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा

आतापर्यंत वार्षिक पर्जन्य मानाच्या तुलनेत ८५.७ टक्के पाऊस पडला आहे. सुधागड, उरण, पोलादपूर, महाड, रोहा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुधागड, रोहा, उरण, पोलादपूर तालुक्यात १२६ टक्के पाऊस पडला आहे. अलिबाग तालुक्यात १०३.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

इतर तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. श्रीवर्धन तालुक्यात सर्वात कमी ७३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील उन्हेरे कवेळे यांच्यासह इतर धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्प पैकी २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरली आहेत. चार धरणे ९९ टक्के भरली असून एक धरण ९५ टक्के भरले आहे. सुधागड, श्रीवर्धनमधील धरणे पूर्ण भरली नाही. २८ धरणांमध्ये ९६.९५ टक्के पाणीपुरवठा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news