Diveagar Siddhanath Kedarnath Yatra: दिवेआगर नगरीत यात्रेची लगबग सुरु; 31 मार्च ते 1 एप्रिलला भरणार यात्रा; ‘गळी फिरणे’ पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता

चैत्र चतुर्दशी-पौर्णिमेनिमित्त यात्रेला सुरुवात; सुवर्ण गणेश नगरीत भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित
Diveagar Siddhanath Kedarnath Yatra
Diveagar Siddhanath Kedarnath YatraPudhari
Published on
Updated on

दिवेआगर/बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर नगरीत यात्रेची सुरुवात दिसून येत आहे. दिवेआगर हे सुवर्ण गणेश मंदिर तसेच विस्तीर्ण समुद्रअसा किनारा म्हणून ओळखला जाणार पर्यटन स्थळ आहे.दिवेआगर येथे चैत्र शु.चतुर्दशी व पौर्णिमेला श्री.सिद्धनाथ आणि श्री.केदारनाथ यात्रा भरवली जाते. यात्रेला पंचक्रोशीतून तसेच राज्यभरातुन भाविक दर्शनासाठी येत असतात.

Diveagar Siddhanath Kedarnath Yatra
Raigad Plantation Scam: चिंचोटी वनघोटाळ्यातील आरोपींवर कारवाईची टांगती तलवार

यात्रेचे मुख्य वैशिष्ट म्हणजे गळी फिरणे व हातकोडे हे बघायला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करत असतात. यात्रेच्या आधी दोन दिवस गावातून श्रीभैरवनाथाची परडी फिरवली जाते. दरवर्षी प्रमाणे गावातील मंडळीकडून मान दिला जातो.

दिवेआगर नगरीत यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात सध्या यात्रेची जोरदार लगबग सुरू असून सर्वत्र तयारीचा धडाका पाहायला मिळत आहे.यात्रेनिमित्त मंडप उभारणी, सजावट, तसेच विविध स्टॉल्सची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनीही यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपली दुकाने सजवली असून, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची रेलचेल दिसत आहे.

Diveagar Siddhanath Kedarnath Yatra
Shahapur Forest Fire: शहापूर तालुक्यात वणव्याचा कहर; ८५% जंगल जळाले, वन्यजीवांचा जीव धोक्यात

यात्रेच्या अंतिम टप्प्यात परंपरेनुसार मंदिराच्या आवारात हातकोडे खेळलं जाते. आपली मनोकामना पूर्ण होण्यास भक्तांकडून देवाला साकडं घातलं जाते. नंतर यात्रेचे वैशिष्ट्य म्हणेज गळी फिरणे. या क्षणाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. मंदिराच्या समोर असणाऱ्या चौथरावर मानकऱ्यालापाठीत गळ टुपवण्यात येतो.

श्री सुवर्ण गणेशाच्या पवित्र भूमि मध्ये 31 मार्च व 1 एप्रिलला श्री सिद्धनाथ भैरव व श्री केदारनाथ लिंग यांची चैत्रशुद्ध चतुर्दशी व चैत्र शुद्ध पौर्णिमेला या तिथीप्रमाणे यात्रा भरवली आहे. यात्रेची जोरदार तयारी चालू आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री सिद्धनाथ भैरव व केदारनाथ लिंग देवस्थान ट्रस्ट तसेच दिघी सागरी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत दिवेआगर व दिवेआगर ग्रामस्थ यात्रेसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

प्रणव आनंद हावरे, उपाध्यक्ष, श्री सिद्धनाथ भैरव व श्री केदारनाथ लिंग देवस्थान ट्रस्ट, दिवेआगर

Diveagar Siddhanath Kedarnath Yatra
Kasadi River Pollution: तळोज्यात कासाडी नदी पुन्हा काळवंडली; औद्योगिक सांडपाण्यामुळे पर्यावरण धोक्यात

विशेष म्हणजे गळ टूपवून घेत असताना रक्ताचं एक थेंबही दिसून येत नाही. हि लाट साधारण 25 ते 30 फुटावर आहे. त्यानंतर मानकऱ्याला लाट फिरवण्यासाठी नेलं जात आणि मानकऱ्याला गळ्याच्या दिशेने पाच फेऱ्या मारल्या जातात. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक कमिटी, ग्रामपंचायत दिवेआगर, तसेच दिघी सागरी पोलीस सतर्क असून सुरक्षा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news