Kasadi River Pollution: तळोज्यात कासाडी नदी पुन्हा काळवंडली; औद्योगिक सांडपाण्यामुळे पर्यावरण धोक्यात

नदीतील प्राणवायूची पातळी घटली; दुर्गंधी वाढल्याने नागरिकांमध्ये संताप, चौकशीची मागणी
Kasadi River Pollution
Kasadi River PollutionPudhari
Published on
Updated on

पनवेल : तळोजा परिसरातून वाहणारी कासाडी नदी पुन्हा एकदा काळसर रंगाच्या पाण्याने दूषित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील पर्यावरणीय स्थिती गंभीर बनली आहे. मध्य भागातून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात वारंवार औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Kasadi River Pollution
Uran Tadgola Demand: उन्हाळ्याची काहिली वाढताच उरणमध्ये ताडगोळ्यांची मागणी; दर २०० रुपयांपर्यंत

नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे काळवंडल्याने या भागात प्राणवायूची पातळी मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील मासे व इतरजलचर जीव जवळपास नाहीसे झाल्याचे दिसून येत आहे. तर, काही ठिकाणी दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.याविरोधात येथील नागरिकांनी प्रदुषण नियंत्रण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिक आता संताप व्यक्त करू लागले आहेत.

Kasadi River Pollution
Raigad Fort Road: रायगड गडाकडे जाणारा खर्डी–नेवाळी मार्ग धोकादायक; लाखो खर्चूनही रस्ता अद्याप जोखमीचा

या नदीचे पाणी दिवसेंदिवस अधिक काळवंडत असतानाही संबंधित यंत्रणांकडून केवळ पाहणीचा देखावा उभा करून नदीचे पाणी काळवंडण्यामागचे खरे कारण दडवत असल्याचा आरोप आता येथील नागरिक करू लागले आहेत. नदीच्या दूषित पाण्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडलीच तर, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

Kasadi River Pollution
Maharashtra Tourism Growth: महाराष्ट्र पर्यटनाला ‘सुवर्णकाळ’; विदेशी पर्यटकांची संख्या दोन वर्षांत दुप्पट

कासाडी नदिच्या प्रदुषमाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

सतीश पडवळ उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news