ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर ठरणार महारोजगाराचे केंद्र; खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

कोकणात प्रदूषणविरहित कारखानदारी आणून रोजगार निर्मितीवर भर
ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर ठरणार महारोजगाराचे केंद्र; खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

म्हसळा: कोकणातील तरुणांचे स्थलांतर थांबवून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रदूषणविरहित कारखानदारी आणण्यावर आपला भर आहे.

त्यासाठी स्थानिक युवकांना आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यात येथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर’ प्रकल्पामुळे कोकणातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र शासन आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात यासाठी सामंजस्य करार झाला असून या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती सोमवारी तटकरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.

ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर ठरणार महारोजगाराचे केंद्र; खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
Irrigation Well Subsidy: विहीर बांधली, खर्चही केला; पण सरकारी अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

दिघी येथील प्रस्तावित प्रकल्प सुमारे २ हजार एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे ६ हजार कोटी रुपये तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. प्रकल्पातून सुमारे १५ हजार प्रत्यक्ष आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारची १९ ऑगस्ट २०२६ रोजी तत्त्वतःमंजुरी मिळाली असून, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची अँकर शिपयार्ड म्हणून निवड करण्यात आली आहे.

जहाजबांधणी क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक युवकांना जहाजबांधणी क्षेत्रातील आवश्यक ट्रेडचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी मतदारसंघातील आयटीआयच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर ठरणार महारोजगाराचे केंद्र; खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
Khar Mhada Redevelopment: खारमधील म्हाडाच्या 56 वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, घरांचा आकारही वाढणार

भविष्यात स्थानिक तरुणांनाच या प्रकल्पात रोजगाराच्या संधी मिळाव्यात हा आपला प्रयत्न असल्याचे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.

उद्योग उभारताना पर्यावरणाची काळजी घेत प्रदूषणविरहित औद्योगिक विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर दिघी बंदर प्रकल्पात बाधीत मच्छीमार बांधवांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यावर आपला भर असणार आहे असेही खासदार तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

एमआयडीसी प्रकल्प विरोधामुळे रखडला

मी २००९ साली श्रीवर्धन मतदारसंघाचा आमदार झालो, नंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री व रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी सत्तेत असताना म्हसळा तालुक्यातील वारळ येथे एमआयडीसी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्थानिक विरोधामुळे तो पुढे जाऊ शकला नाही. त्यावेळी स्थानिकांनी विरोध केला नसता तर आज हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता अशी खंतही तटकरे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news