महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा : नितेश राणे

महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा : नितेश राणे

महाड; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसापूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्याप्रकरणी पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू आहे. महाड तालुक्यातील संबंधित कत्तलखाने ताबडतोब उध्वस्त करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात कारवाई न केल्यास आम्हाला हातात शस्त्र घ्यावी लागतील, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

बुधवारी रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक शंकर काळे यांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी गोरक्षकांविरोधात झालेल्या मारहाणीच्या बाबत पोलिसांना धारेवर धरले. कायद्याचे राज्य राज्यात असताना अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना या दुर्दैवी व संतापजनक आहेत. गाईचे रक्षण करण्यासाठी गेलेले हिंदूंवर झालेला हल्ला यापुढे आम्ही सहन करणार नाही, संबंधितांना जशास तसे उत्तरे देऊ, अशा शब्दात त्यांनी डीवायएसपी शंकर काळे यांना धारेवर धरले.

संबंधित समाजकंटकांकडून पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत होते कशी, असा सवाल करून या घटनेनंतरही गोरक्षकांना दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी सहन करणार नाही व गोरक्षकांविरोधात कारवाई केल्यास विधानसभेमध्ये जाब विचारू असे ते म्हणाले. कायदा सर्वांना समान आहे तर या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण काय, संबंधित दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी महाड पोलादपूरमधील गोरक्षकांसह शेकडो हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news