रायगड : काळ नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ! | पुढारी

रायगड : काळ नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ!

महाड : पुढारी वृत्‍तसेवा महाड तालुक्यातील आमशेत कोंडगाव हद्दीतील काळ नदीपात्रात (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत महाड एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना आमशेत कोंडगावच्या हद्दीतील काळ नदीपात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खबर मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा ताबा घेतला. परंतु मृतदेह सडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख मात्र पटवता आली नाही. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकचा तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button