Election Rules Violation : माथेरान न.प. निवडणुकीत शासकीय वाहनाचा गैरवापर

आचारसंहितेचा भंग केल्याची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
Election Code Violation
माथेरान न.प. निवडणुकीत शासकीय वाहनाचा गैरवापर pudhari photo
Published on
Updated on

नेरळ : माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी निवडणूक आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाहीसाठी आयोगाने हा अर्ज रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे.

याबाबत राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या १९ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार, कर्जत येथील दिगंबर चंदने यांनी ११ मे २०२६ रोजी सादर केलेला अर्ज आयोगास १४ मे रोजी प्राप्त झाला होता.

Election Code Violation
Raigad Bribery Case : सातबारा नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी

आयोगाने आपल्या पत्रात सदर अर्जातील विषय हा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असल्याचे नमूद करत पुढील योग्य कार्यवाहीसाठी तो रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारदारास त्यांच्या स्तरावरून कार्यवाहीबाबत कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Election Code Violation
Jamner Fire | जामनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला आग

राज्य निवडणूक आयोगाचे तहसीलदार किशोर साळवे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले असून त्याची प्रत तक्रारदार दिगंबर चंदने यांनाही पाठविण्यात आली आहे. आता या प्रकरणात रायगड जिल्हाधिकारी कार्यालय कोणती चौकशी करते आणि पुढे काय कार्यवाही होते, याकडे माथेरानसह कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा

माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळात शासकीय वाहनाचा वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणताही अंतिम निष्कर्ष अथवा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news