CM Eknath Shinde on Irshalwadi homes
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इर्शाळवाडीतील कुटुंबाची दिवाळी नवीन घरात होणार : मुख्यमंत्री शिंदे

इर्शाळवाडी येथील नवीन वसाहतीच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
Published on

खोपोली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.४) सायंकाळी अचानक खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती ग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या घरांची सुख-सुविधांची पाहणी करत माहिती घेतली. लवकरच या घरांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून या कुटुंबाची दिवाळी नवीन घरात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

CM Eknath Shinde on Irshalwadi homes
साधूंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, चौक ग्राम पंचायतीच्या सरपंच रितु ठोंबरे, संपर्कप्रमुख विजय पाटील, तालुकाप्रमुख संदेश पाटील यासह चौक ग्रामपंचयत सदस्य व नागरिक आदी कार्यकर्ते त्यांच्या सोबत उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे हे अचानक आल्याने अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (दि.४) कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपला दौरा अचानकपणे खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावाचे पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वळविला. मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे आपला दौरा ईरशालवाडी भेटीसाठी वळविल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनर्वसन ईरशालवाडी येथे उभारण्यात आलेली घरे, दवाखाना, शाळा, अंगणवाडी आदी सर्व कामांची पाहणी केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, इर्शाळवाडी ग्रामस्थांवर भयानक संकट कोसळले होते. या संकटात महाराष्ट्र सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचा तुटलेला संसार नव्याने उभारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. येणाऱ्या दिवाळीला ईरशालवाडी ग्रामस्थ नव्या पुनर्वसन गावातील घरात असतील, अश्या पध्दतीने पुनर्वसन वसाहतीचे काम सुरू आहे.

CM Eknath Shinde on Irshalwadi homes
लाडक्या बहिणी विरोधकांना जोडा दाखवतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news