

रेवदंडा : महेंद्र खैरे
कोर्लईतील पोर्तुगीज राजवटीत बांधण्यात आलेले माऊंट कार्मेल चर्च हे केवळ ख्रिश्चन बांधवांचे नव्हे तर सर्वधर्मियांचेही श्रद्धास्थान बनले आहे. दरवर्षी नाताळला या चर्चमध्ये प्रभू येशुसाठी प्रार्थना केली जाते. नाताळनिमित्त 25 डिसेंबरपासून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोर्लईच्या ख्रिश्चन पाडयात 235 घरे असून 1200 लोकसंख्या ख्रिश्चन बांधवाची आहे. या ख्रिश्चन पाडयात रोजारिओ, डिसुजा, परेरा, मार्तीस, रॉड्रिक्स, वेगास, रोचा, पेना आणि गोम्स ही प्रमुख सात घराणी तसेच गोवा व दिव दमण मधून आलेली काही कुटूबे येथे वास्तव्यात आहेत. कोर्लई मधील ख्रिश्चन बांधव प्रामुख्याने शेती, भाजीपाला तसेच मासेमारी हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.
काळाच्या ओघात कोर्लई मधील ख्रिश्चन पाडयातील ख्रिश्चन बांधव मुंबई, पुणा, ठाणे, अलिबाग, रोहा, पनवेल, उरण, आदी भागात कामानिमित्त स्थलांतरीत झाले. मात्र कोर्लईच्या माउंट कार्मेल चर्च व कोर्लई ख्रिश्चन पाडा यांचेशी ऋणाबंध अदयापी ठेवून आहेत. पोर्तुगिजाची वस्ती कोर्लई भागात होऊ लागली. पुढे स्थानिक व पोर्तुगीज यांच्यातील संवादासाठी नॉ लिंग भाषेची निर्मिती झाली. या भाषेला कोर्लई क्रिओल पोर्तुगीज असेही म्हटले जाते.
सध्या कोर्लई गावाच्या एका बाजूस टेकडीच्या छायेत ख्रिश्चन बांधवाची लोकवस्ती आहे. कोर्लई येथे ख्रिश्चन बांधवाचे प्रार्थनास्थळ माउंट कार्मेल चर्च दिमाखाने उभे आहे. कोर्लई मधील ख्रिश्चन बांधवाचे प्रार्थनास्थळ असलेल माऊंट कार्मेल चर्च सन 1713 मध्ये बांधले गेल्याचे लिखीत आहे. दीडशे वर्ष चौलमध्ये सत्ता उपभोगल्यानंतर मराठ्यांशी झालेल्या युध्दात पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगीज व मराठे यांच्या तहानुसार सन 1740 मध्ये पोर्तुगीज येथून निघून गेले.
सन 1713 साली बांधले गेलेले कोर्लई येथील माउंट कार्मेल चर्च हे पोर्तुगिज काळातील असल्याचे स्पष्ट होते. मुरूड तालुक्यात येत असलेले कोर्लई या ख्रिश्चन पाडयाच्या शेजारी तीनशे वर्षापुर्वी बांधलेले व पोर्तुगीज काळाची आठवण देणारे माउंट कार्मेल चर्च आहे. पोर्तुगिज काळापासून विशिष्ट नॉ लिंग (कोर्लई क्रिओल) भाषेत संवाद करीत अस लेले ख्रिश्चन बांधव व येथील माउंट कार्मेल चर्च हे कोर्लई मधील ऐतिहासिक वारसा आहे.
25 डिसेंबरपासून होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यामध्ये गायन स्पर्धा, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा. मोठ्या गटासाठी नृत्य. स्पर्धा असतील. लहान मुलांसाठी नृत्यस्पर्धा विषय प्रभू येशूच्या जन्माची कहाणी ही गीते तर मोठ्या गटासाठी विषय ईस्ट इंडियन संस्कृती हे सादरीकरण होईल. या दिवसाच्या समारोप गाव जेवणाने होईल. 31 डिसेंबर 2025 रात्री गतवर्षाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी प्रार्थनेचा आयोजन केलेला आहे.
प्रभू येशूचा जन्मदिवस उत्सव
आज मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थनेचा आयोजन केलेला आहे. नाताळ गीतांना रात्रीच्या मिस्साबलिदानानी सुरुवात होते व संपूर्ण जगभरासाठी शांतीसाठी प्रार्थनेचे आयोजन केले जाईल.
25 डिसेंबर रोजी सकाळी सुद्धा मिस्साबलिदानाच आयोजन असेल दुपारी क्षणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संपूर्ण धर्मग्रामातील लोकांसाठी खेळायचे आयोजन केलेले आहे.
26 व 27 डिसेंबर रोजी रायगड डिनरीचा युवा महोत्सव.
28 डिसेंबर रोजी प्रभू येशूच्या जन्माचे देखावे स्पर्धा साजरी होईल.
29 डिसेंबर रोजी तारखा स्पर्धेचा आयोजन केलेला आहे.
30 डिसेंबर रोजी क्रिसमस धमाकाचे आयोजन आहे.