

ठाणे : अमली पदार्थ, गुटखा माफियांच्या विरोधात ठाणे शहर पोलिसांनी रणशिंग फुकलेले असतानाच वर्षाच्या अखेरच्या महिन्यात ठाणे ग्रामीण पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी अनेक धडक कारवाया आणि गुन्ह्यांची उकल करण्यात मजल मारली.
दरम्यान अधिवेशनात ड्रग्ज आणि गुटखा माफियांचा प्रश्न अधिवेशनात पटलावर गाजला. तर भिवंडी तालुका पोलिसांनी गुटखा माफियाच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात पाठविला. मात्र त्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भिवंडी परिसरात ड्रग्ज आणि गुटख्याचा बेकायदेशीर व्यवसाय भयावह स्वरूप धारण करत आहे. सातत्याने पोलीस कारवाई होत असले तरी अवैध वाहतुकीवर प्रभावी आळा बसलेला नाही. अनेक प्रकरणांत आरोपी जामिनावर बाहेर येऊन पुन्हा त्याच धंद्यात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
हा गंभीर मुद्दा भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. गुजरातमधून येणारी गुटख्याने भरलेली वाहने भिवंडीत पकडली जात असून त्यावर चोरीचे गुन्हे दाखल केल्याने आरोपी जामिनावर मोकळे फिरतात.