

अलिबाग ः राज्यातील भाजपच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेची युती जाहीर केली खरी, पण त्याचा रायगडच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाहीत. उलट ठाकरे बंधुंना रायगडात अस्तित्व दाखविण्यासाठीझगडावे लागणार आहे.आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जर दोन्ही पक्ष एकत्र लढून यशस्वी झाले तरच रायगडात अस्तित्व दिसून येईल.
गेल्या काही वर्षात भाजपने अवघा महाराष्ट्र व्यापलाआहे.केंद्र आणि राज्यातील सत्तेचा विनियोग करुन भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तळागाळापर्यंत खंबीरपणे पाय रोवलेले आहेत.याशिवाय शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांची ताकद क्षीण झालेली आहे.मविआमध्ये मतभेद निर्माणझालेेले आहेत.यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीएकत्र येण्याचा निर्णयघेतलाआहे.त्याबाबतची अधिकृत घोषणाही बुधवारी मुंबईत करण्यात आली आहे.
मुंबईसह काही महापालिकांमध्ये दोघे बंधू एकत्र युतीने लढणार आहेत.या दोघांच्या एकत्र येण्याचा काय परिणाम होतो हे निकालातून दिसून येणार आहे. नुकत्याचझालेल्या नगरपालिका निवडणुकीत तर मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.तर पक्ष फुटीनंतरही ठाकरे शिवसेनेने श्रीवर्धनचे नगराध्यक्षपद आणि जिल्ह्यात 10 नगरसेवक विजयी झालेले आहेत.त्यामुळे सध्या तरी ठाकरेशिवसेना मनसेपेक्षा वरचढ आहे.
दोन्ही पक्षांचे रायगडात मनोमिलन झाले तरी त्याचा फारसा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरउमटणे अशक्य वाटते.कारण दोन्ही पक्षांना एकत्र सांधणारे नेतृत्वच रायगडात नाही हे नाकारता येणार नाही.यासाठी आधी नेतृत्व तयार करुन मगच एकत्रिकरणाबाबत प्रक्रिया सुरु करणे गरजेचे आहे.
महापालिकांच्या रणसंग्रामानंतर रायगड जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे.तोपर्यंत जरी दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष रायगडातएकत्र आले तरी निदान जि.प.,पं.स निवडणुकीत उभयतांचे अस्तित्व तरी दिसून येईल.यासाठी त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच करणे गरजेचे आहे.
पनवेलमध्ये मजबूत संघटन गरजेचे
रायगडचा विचार केल्यास जिल्ह्यात पनवेल महापालिकेची निवडणूक होत आहे.यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हेअद्याप जाहीर झालेले नाही.मात्र,जर समजा आले तरी त्याचा फारसा प्रभाव पनवेलमध्ये उमटणेअशक्य आहे. कारण पनवेलमध्ये दोन्ही पक्षांची ताकदच क्षीण झालेली आहे. पक्षफुटीनंतर तर शिवसेनेची मोठी वाताहात झाल्याचे नाकारता येत नाही.
मनसेचे सुरुवातीच्या काळात पनवेल परिसरात अस्तित्व होते.पण नंतर पक्षाला नेतृत्वच न मिळाल्याने हातावर मोजण्याएवढेही नेते,पदाधिकारी आहेत की नाहीत याबाबत साशंकता आहे.ठाकरे गटाकडेही अशीच स्थिती आहे.त्यामुळे पनवेलध्ये दोन्ही पक्षांना आधी संघटन मजबूत करावे लागेल. त्यातून निवडूण येण्याची क्षमता असणारे उमेदवार शोधावे लागतील.त्यात भाजपच्या झंझावातापुढे किती टिकतात हे पाहणेही उचित ठरणारे आहे.