Chavdar Tale Satyagraha celebration : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार चवदार तळे सत्याग्रह दिनाचा सोहळा

मंत्रालय स्तरावरून घेण्यात आला कार्यक्रमस्थळाचा आढावा
Chavdar Tale Satyagraha celebration
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार चवदार तळे सत्याग्रह दिनाचा सोहळाpudhari photo
Published on
Updated on

महाड ः महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाचा 99 वा दिन 20 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि विशेष व्यक्ती उपस्थित राहाणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ( 11 मार्च ) दुपारच्या सुमारास मंत्रालय स्तरावरून आलेल्या काही अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आढावा घेतल्याची माहिती मिळाली असून याद्वारे कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे.

कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय पोलीस मानवंदना कार्यक्रमाबाबतही अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. ना.भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या मानवंदना कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. कार्यक्रमस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी या उपक्रमाची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

Chavdar Tale Satyagraha celebration
Industrial gas shortage : औद्योगिक गॅसपुरवठ्यात देशभर 20% कपात!

दरम्यान, नामदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून चवदारतळे सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे,तसेच महाड नगर परिषद आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून स्मारक परिसरातील सुशोभीकरणाची कामे सध्या जोरात सुरू असून ती 20 मार्चपूर्वी बहुतांश पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Chavdar Tale Satyagraha celebration
Kalu Dam protest women : काळु धरणाविरोधात महिलांचा एल्गार

कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रम स्थळी घेण्यात आलेल्या या आढावाप्रसंगी मंत्रालया स्तरावरून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी

सत्याग्रह दिनानिमित्त येणाऱ्या भीमसैनिकांच्या निवास व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे समजते. गतवर्षीप्रमाणे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. यंदाही असे नियोजन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news