

रोहे : महादेव सरसंबे
मध्य रेल्वे द्वारे आपल्या प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्याच्या तटस्थ वचनबद्धते अंतर्गत, अनधिकृत व विनातिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी उपाययोजना अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत.या तीव्र व नियोजित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे, आर्थिक वर्ष 202526 (एप्रिल ते डिसेंबर 2025) दरम्यान मध्य रेल्वेने लक्षणीय परिणाम साधले आहेत. आर्थिक वर्ष 202526 दरम्यान 30.75 लाख अनधिकृत व विनातिकीट प्रवाशांकडून 183.16 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष 202526 (एप्रिल ते डिसेंबर 2025) दरम्यान 30.75 लाख प्रवाशांना, जे विनातिकीट किंवा अपूर्ण/अवैध तिकीटासह प्रवास करत होते त्यांना अटक केली. मागील आर्थिक वर्षातील याच काळात 28.01 लाख प्रवाशांची अटक झाल्यामुळे ही संख्या सुमारे 10% ने वाढली आहे.
आर्थिक वर्ष 202526 (एप्रिल ते डिसेंबर 2025) दरम्यान दंड म्हणून 183.16 कोटी रुपये रक्कम वसूल झाली, मागील आर्थिक वर्षाच्या याच काळात वसूल झालेल्या 151.99 कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम 20% पेक्षा जास्त वाढलेली आहे.
डिसेंबर 2025 महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने 3.24 लाख प्रवाशांना, जे विनातिकीट किंवा अपूर्ण/अवैध तिकिटासह प्रवास करत होते त्यांना अटक केली, तर डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.93 लाख होती, ज्यामध्ये सुमारे 10% पेक्षा जास्त वाढ दर्शवते.
डिसेंबर 2025 महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून दंड म्हणून 18.25 कोटी रुपये वसूल झाले, तर डिसेंबर 2024 मध्ये ही रक्कम 13.55 कोटी रुपये होती, ज्यामध्ये सुमारे 35% वाढ झाल्याचे दिसून येते.
आर्थिक वर्ष 202526 (एप्रिल ते डिसेंबर 2025) साठी विभागानुसार तपशील तसेच विनातिकीट/अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या व त्यांच्याकडून वसूल केलेली दंड रक्कम विभागनीय पहाता भुसावळ विभागात 7.54 लाख प्रकरणांमधून 63.83 कोटी रुपये, मुंबई विभागात 12.82 लाख प्रकरणांमधून 55.12 कोटी रुपये,पुणे विभाग: 3.41 लाख प्रकरणांमधून 20.84 कोटी रुपये,नागपूर विभागात 3.33 लाख प्रकरणांमधून 20.75 कोटी रुपये,सोलापूर विभागात 1.81 लाख प्रकरणांमधून 8.39 कोटी रुपये मुख्यालया अंतर्गत 1.83 लाख प्रकरणांमधून 14.22 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आले.
मध्य रेल्वेने अनधिकृत प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे, ज्यामध्ये स्थानक तपासणी, सापळा तपासण्या, किल्ला तपासण्या, सखोल तपासण्या आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये मेल/एक्सप्रेस गाड्या, स्थानकगाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी गाड्यांवर केली जाते.
मध्य रेल्वे प्रवाशांकडे आवाहन करत आहे की, अधिकृत विक्रेत्या किंवा स्थानक बुकिंग काउंटर, किंवा वेबसाईट हीीिंं:ि//ुुु.ळीलींल. ले.ळर्पें(हीींं:ि//ुुु.ळीलींल.ले.ळप) द्वारे जारी केलेल्या वैध तिकिटांसहच प्रवास करा. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर रेल वन ॲप डाउनलोड करून त्याद्वारे तिकीट बुक करू शकतात. मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, तिकीट तयार करण्यासाठी/ मिळवण्यासाठी आणि त्यावर प्रवास करण्यासाठी फसवणुकीच्या मार्गांचा वापर करू नका. हा भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत दंडनीय अपराध आहे, ज्यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.रेल्वे प्रवाशांमध्ये विनातिकीट प्रवासाविरुद्धची शून्य सहनशीलता धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करते आणि प्रवाशांना आरामदायी व सन्मानजनक प्रवास मिळावा याची खात्री करण्यासाठी कटिबद्ध आहे.