

रोहे: सुरक्षित, सुलभ व सन्मानजनक प्रवासाची खात्री करण्याच्या आपल्या कटिबद्धतेनुसार मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर अनधिकृत व विनातिकीट प्रवासाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ व तिकीट तपासणीच्या तीव्र मोहिमांमुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये (सप्टेंबर २०२६ पर्यंत) महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत.
एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अयोग्य, अवैध प्रवास प्राधिकरणासह प्रवास करणाऱ्या २०.४७ लाख प्रवाशांना पकडले आहे.
त्यांच्याकडुन १५९.३४ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.०५ लाख प्रकरणे त्यामधुन ११६.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.त्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. यावरून उत्पन्नात ३७ टक्के पेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दंड वसुली आणि प्रकरणांची संख्या पहाता एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विभागनिहाय कामगिरी मध्ये मुंबई विभाग १०.११ लाख प्रकरणांतून ६६.९२ कोटी रुपये, भुसावळ विभाग ३.७७ लाख प्रकरणांतून ३८.९० कोटी रुपये, पुणे विभाग २.१३ लाख प्रकरणांतून १८.६८ कोटी रुपये, नागपूर विभाग २.३६ लाख प्रकरणांतून १७.९३ कोटी रुपये, सोलापूर विभाग १.१० लाख प्रकरणांतून ७.२७ कोटी रुपये, मुख्यालय ०.९९ लाख प्रकरणांतून ९.६३ कोटी रुपये वसुल करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०२६ महिन्यात पथकांनी विनातिकीट व अवैध तिकीटासह प्रवास२.४४ लाख प्रवाशांना पकडले.