

Panvel Latest News
पनवेल : पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केल्याची घटना पनवेल शहरात घडल्याचे उघडल झाले आहे. ही घटना घडल्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणार्या व्यक्तीला पकडून स्थानिक रहिवाशांनी चोप दिला आणि पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना पनवेल शहरात घडली. स्थानिक नागरिकांप्रमाणे, एक अनोळखी इसम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्यानंतर काही क्षणांतच त्याने पुतळ्याची विटंबना करण्याचा अघोरी प्रकार केला. ही बाब लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पकडले. आणि विटंबना करणार्याला चांगलाच चोप दिला.
या वेळी काही काळ तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी संयमाने हस्तक्षेप केला. तसेच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्यात आणली.
नागरिकांची एकजूट
नागरिकांनी एकजुटीने आरोपीस पकडून थेट पनवेल शहर पोलिस ठाण्यात नेले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक ठाण्यात जमले होते आणि त्यांनी आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलीस अधिकार्यांनी शांतता राखण्याचे आवाहन करत, विटंबना करणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.