Panvel unauthorized schools : १३ अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाने पाठवल्या नोटीसा

सुरू असलेल्या या शाळा बंद करण्याच्या सूचना यात देण्यात आलेले आहेत.
Panvel unauthorized schools news
Panvel unauthorized schools : १३ अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाने पाठवल्या नोटीसाFile Photo
Published on
Updated on

Education Department sends notices to 13 unauthorized schools

पनवेल : विक्रम बाबर

पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत 13 शाळांना पंचायत समिती पनवेल, शिक्षण विभागाने शाळा बंद करण्यासाठी तसेच दंडाच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सुरू असलेल्या या शाळा बंद करण्याच्या सूचना यात देण्यात आलेले आहेत.

Panvel unauthorized schools news
Raigad News : मांडल्यातील डोंगर उत्खननाच्या भरावामुळे घरांचे नुकसान

तालुक्यातील अनधिकृत शाळांवर कायदेशीर प्रक्रिया करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे क्रमप्राप्त आहे. मात्र नोटीसा देऊन त्यांची सुटका केली जाते. तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल, नेरे, किड्स गार्डन पब्लिक स्कूल, टेमघर, एस.जी.टी. इंटरनॅशनल करंजाडे, आर 1, साईगणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, खारपाडा, वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे सेक्टर 3.

Panvel unauthorized schools news
Raigad News : पुरेशा वाहतूक सुविधेअभावी पर्यटकांची कोंडी

वेदगृह इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे सेक्टर 4, दि बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल, ओवळे, सनराईस इंग्लिश स्कूल, वावंजे, दि बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल, आर 1, करंजाडे, कै. मंजुळा त्रिंबक (साखरेशेठ) ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा-पाले ब्रुदुक कोळवाडी, ज्ञानाई माध्यमिक विदयालय धामणी-वाजे, न्यु इंग्लिश स्कूल कोपरा, आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल, विचुंबे या शाळांना शासनाची मान्यता नाही. त्यामुळे या शाळा अनधिकृत शाळा असल्याचे पंचायत समिती पनवेल या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाने पाठवलेल्या नोटीसित अनधिकृत शाळा बंद कराव्यात तसेच नवीन वर्षी या शाळा सुरू करू नयेत आणि विद्यार्थ्यांना बाजूच्या शाळेमध्ये समायोजित करावे तसेच शाळेला सूचना देऊन ही शाळा बंद न केल्यास शाळा व्यवस्थापनास एक लाखाचा दंड किंवा प्रत्येक दिवसाला दहा हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news