Ballaleshwar Ganpati : नवसाला पावणार पालीचा श्री बल्लाळेश्वर

अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की जो भक्त बल्लाळ नावाने प्रसिद्ध आहे
Ballaleshwar Ganpati
गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो.Pudhari Photo
Published on
Updated on

Ballaleshwar Ganpati :

जयंत धुळप, रायगड : रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड तालुक्यांतील पाली गावातील श्री बल्लाळेश्वर गणपती राज्यातील अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की, जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे.

आख्यायिका

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास,भृगुऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुदगल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला.

Ballaleshwar Ganpati
Ranjangaon Mahaganpati : नवसाला पावणारा रांजणगावचा महागणपती, जाणून घ्‍या स्वयंभू स्थानाचे ऐतिहासिक महत्त्‍व

बल्लाळाने केला गणेशाचा धावा

बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली ,अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले. आपला मुलगा लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले, या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठचा संताप अनावर झाला. तो ओरडत तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला," 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला," असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.

Ballaleshwar Ganpati
Shri Vighnahar Ganpati Ozar : भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा श्री विघ्नहर

जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील....

'बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.'' तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

Ballaleshwar Ganpati
Morgaon Ganpati : अष्टविनायकांतील प्रथम स्थान मोरगावचा मयूरेश्वर; विशेष महत्त्व, मंदिरातील मूषक मूर्तीचे वैशिष्ट्य काय?

नाना फडणवीस यांनी बांधले मंदिर

नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत.

Ballaleshwar Ganpati
Girijataka Ganapati : भाविकांचे श्रद्धास्थान लेण्याद्रीच्या डोंगरातील श्री गिरीजात्मज

कसे पोहोचाल?

  • पुण्यापासून बल्लाळेश्वर मंदिर ११० किमी अतरावर आहे

  • गोवा महामार्गावरुन वाकण येथून पालीला जाण्यास मार्ग आहे.

  • पेण-पाली एसटी बस सेवा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news