आवास येथे मागील भांडणाच्या रागातून सशस्त्र हल्ला, एकाचा भोसकून खून, तिघे गंभीर जखमी

या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, पाच जणांना रातोरात केली अटक
Pune Crime News
चिंचवडमध्ये चाकूने भोसकून युवतीचा खून; दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांवर गुन्हा File Photo
Published on
Updated on

Armed attack at Awas, one stabbed to death, three seriously injured

रायगड : पुढारी वृत्तसेवा

अलिबाग तालुक्यांतील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास गावांत  (गुरुवार  22 मे) रोजी सव्वा नऊ वाजता भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुंटुंबावर सशस्त्र हल्ला झाला. यामध्ये धर्मेंद्र नंदकुमार राणे (वय ३६ रा.राणे आळी, आवास ) यांचा मृत्यू झाला, तर  विवेक नंदकुमार राणे, विश्वास नदकुमार राणे, आणि करुणा नंदकुमार राणे या तीघांना गंभीर जखमी करण्यात आले आहे.

Pune Crime News
Raigad Fort : किल्ले रायगडावरील पायरी मार्ग २८ व २९ मे रोजी राहणार बंद!

त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक दीपक भोई यांनी दिली आहे.

Pune Crime News
World Turtle Day : कासव दिनाच्या पूर्वसंध्येला कोकणात कासवांची ९ घरटी वाचवण्यात यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नंदकुमार राणे (वय 34) व त्यांचे कुटूंबीय त्यांच्या फोर व्हीलर गाडीमध्ये पावसाचे पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ती लावत होते. यावेळी संशयित देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे यांनी चाकू, सुरा आणि तलवारीसह तेथे येऊन शिवीगाळ करून मागील भांडणांचा मनात राग धरून भाडणास प्रारंभ केला. 

Pune Crime News
International Day for Biological Diversity |पश्चिम घाट : 'पृथ्वीचा चमत्कार'!

यातील संशयित आरोपीत वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास नदकुमार राणे (वय ३२) यास पकडून ठेवून संशयित आरोपी देवेंद्र म्हात्रे याने त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून खून केला. तसेच फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास धर्मेंद्र यास सोडविण्यास गेले असता संशयित आरोपीत शुभम पाटील याने विश्वास यास पकडून अंकित राणे याने ठारच मारतो असे बोलून त्याच्या छातीत देखील चाकू भोसकला. फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून संशयित आरोपी सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्या करता आली असता पूनम म्हात्रे हीने विवेक नंदकुमार राणे यांच्या  आईच्या  मानेवर सुरा मारून गंभीर दुखापत केली.

या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी विवेक नंदकुमार राणे यांनी रुग्णालयातच मांडवा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारी नुसार मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, संशयित आरोपिंना सत्वर अटक केली आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक दीपक भोई यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news