

अलिबाग : दीपावली सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटकांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे. त्यात सरकारी कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले आहेत. अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन झाले की पुणे मुंबई ठाणे पश्चिम महाराष्ट्र येथून असंख्य पर्यटक दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दाखल होतात. मात्र यावर्षी शनिवार रविवार लागून सुटी आल्याने पर्यटकांनी दिवाळी साजरा करण्यासाठी आधीच हजेरी लावली आहे.
रायगड जिल्ह्यात बारमाही पर्यटन सुरु असते. नुकताच पावसाळा संपला असून हिवाळी पर्यटनाला सुरवात आला आहे. पर्यटन दृष्टीने हा जिल्हा विकसित होत आहे. गेल्या काही वर्षीय पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे येथील ऐतिहासिक , धार्मिक ठिकाणे हे पर्यटनाचे आकर्षण ठरले आह तसेच समुद्र किनारी गोव्याच्या धर्तीवर सुरु असलेले वॉटर गेम हे अबालवृद्धांचे आकर्षण ठरत आहे.
यावर्षी दिवाळीची सुट्टी तसेच दिवली सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटन हजेरी लावली आहे. समुद्रकिनारी असणारे हॉटेल कॉटेज हाऊसफुल्ल झाली आहेत पर्यटकांना आवश्यक आणि अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी हॉटेल कॉटेज चे मालकही सज्ज झाले आहेत. यामधूनच आपण व्यवसाय वृद्धिंगत होत असतो.
जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळावरही पर्यटकांची मांदियाळी असते. किल्ले रायगड ,किल्ले जंजिरा किल्ले कुलाबा कर्नाळा आदी ऐतिहासिक स्थळांवरही पर्यटक भेट देत असतात. तसेच पाळी येथहिल बल्लाळेश्वर, महड येथील वरदविनायक श्रीवर्धन येथील सुवर्ण गणेश ईथेही पर्यटकांची गर्दी असते.