Fodder Shortage: चौलमध्ये सुक्या चाऱ्याची भीषण टंचाई; पशुपालक अडचणीत, दूध उत्पादन घटले

मागील काही दिवसांपासून सुक्या चाऱ्याच्या भीषण टंचाईमुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे.
Fodder Shortage
Fodder ShortagePudhari
Published on
Updated on

रायगड: अलिबाग तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पर्यटन व्यवसायामुळे ओळख असली तरी येथील अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत शेती आणि पशुपालन आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुक्या चाऱ्याच्या भीषण टंचाईमुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे.

सतत बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि अनियमित हवामानामुळे चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, सध्या सुक्या चाऱ्याची तीव्र कमतरता जाणवत असून पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

Fodder Shortage
Konkan Railway: कोकण रेल्वेने सुरक्षितता आणि सेवेमध्ये गाठला नवा मैलाचा दगड

पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होताना दिसत आहे. दुधाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

एकीकडे दुधाला मिळणारा दर आणि दुसरीकडे वाढता खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण बनले आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने सुक्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. अन्यथा येणाऱ्या काळात पशुपालन व्यवसाय मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Fodder Shortage
llegal Construction: रायगड किल्ला परिसरातील 48 अनधिकृत बांधकामांंना महसूलच्या नोटिसा

सध्या सुक्या चाऱ्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्यामुळे त्यांचे आरोग्य खालावत आहे आणि दूध उत्पादनही कमी झाले आहे. खर्च वाढत चालला आहे, पण उत्पन्न घटत असल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत.

- मितेश वैद्य, दुध व्यावसायिक,चौल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news