Konkan Railway: कोकण रेल्वेने सुरक्षितता आणि सेवेमध्ये गाठला नवा मैलाचा दगड

विकसीत भारत संकल्पनेंतर्गत विविध क्षेत्रात यश, कोकण रेल्वे अध्यक्ष संतोषकुमार झा यांची माहिती
Konkan Railway
Konkan RailwayPudhari
Published on
Updated on

रायगड: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या विकसीत भारतच्या संकल्पनेला दृढपणे पुढे नेत, उत्कृष्टता, नावीन्य आणि सेवेचे एक महत्त्वाचे वर्ष पूर्ण केले आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत, केआरसीएलने निसर्गरम्य कोकण प्रदेशात कनेक्टिव्हिटी, सुरक्षा आणि शाश्वतता लक्षणीयरीत्या वाढवली असून त्यामुळे आर्थिक विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लागला आहे.

या वर्षीची कामगिरी जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सबका साथ, सबका विकास याप्रती असलेली केआरसीएल वचनबद्धता दर्शवते, असे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी म्हटले आहे.

Konkan Railway
llegal Construction: रायगड किल्ला परिसरातील 48 अनधिकृत बांधकामांंना महसूलच्या नोटिसा

कोकण रेल्वेने संपूर्ण नेटवर्कवर प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीतून आतापर्यंतचा सर्वाधिक 27.59 कोटी रुपयांचा महसूल वसुल केला आहे. रांजणगाव, अयोध्या आणि रामेश्वरमला जोडणाऱ्या 6 एफटीआर सेवांसह देव दर्शन विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांमध्येही यश संपादन केले आहे. राष्ट्रीय संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करून, युएसबीआरएल प्रकल्प पूर्ण करण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. आव्हानात्मक भूभागावर सुरक्षितता आणि कार्यान्वयन विश्वसनीयता वाढवण्यासाठी पूल, बोगदे आणि सिग्नलिंग प्रणाली अद्ययावत करण्यात आल्या.

स्टेशनच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

10 स्थानकांवर एक्झिक्युटिव्ह लाउंज व एसी लाउंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, मुकांबिका रोड बयंदूर आणि उडुपी येथे ही सुविधा देण्यात आली आहे. सावंतवाडी रोड आणि रत्नागिरी येथे रेल आर्केडचे कंत्राट देण्यात आले.

रत्नागिरी, थिविम आणि उडुपी येथे डिजी लॉकर सुविधा उपलब्ध आहे. वैभववाडी रस्त्यावर पादचारी पुलाचे बांधकाम. कुमटा आणि गोकर्णा येथे उच्चस्तरीय प्लॅटफॉर्मचा विकास. सुरतकल, उडुपी आणि मुल्की स्थानकांवर प्लॅटफॉर्म शेल्टर आणि प्लॅटफॉर्म पृष्ठभागाचे काम पूर्ण झाले आहे.

Konkan Railway
Poladpur Road Issue: शहरातील रस्ते सुसाट मात्र ग्रामीण भागात खडखडाट

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नव्या जोमाने आणि भविष्यासाठीच्या स्पष्ट दृष्टिकोनासह वाटचाल करत आहे. सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवासी-केंद्रित सेवेवर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून, केआरसीएल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, प्रवासाचा अनुभव उंचावण्यासाठी आणि आपल्या सर्व भागधारकांना अधिक मूल्य प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.

रो-रो रेल्वे क्षमता वृद्धीसह, ड्रोन-आधारित ट्रॅक मॉनिटरिंग

रो-रो रेल्वेवहन क्षमता 50 मेट्रिक टनवरून 57 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याने , मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारली आहे. लोको रिव्हर्सलसाठी मडगाव स्टेशनवर रोड-6 लाईनचा विस्तार , ज्यामुळे कार्यान्वयन कार्यक्षमता वाढेल आणि एकूण क्षमता वाढीस हातभार लागेल. ड्रोन-आधारित ट्रॅक मॉनिटरिंगसारख्या नाविन्यपूर्ण उपायांचा पाया घातला , ज्यामुळे देखभालीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

1,400 विशेष रेल्वे सेवा चालवण्यात यश

मागील आर्थिक वर्षात, विविध प्रसंगी एकूण 1,400 विशेष रेल्वे सेवा चालवण्यात आल्या, ज्यामध्ये 376 गणपती विशेष गाड्या, 185 उन्हाळी विशेष गाड्या, 86 हिवाळी विशेष गाड्या, 38 एफटीआर (पूर्ण दर) सेवा आणि 715 इतर विशेष सेवांचा समावेश होता . नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, करमाळी, थिविम, कारवार, मुर्देश्वर आणि उडुपी स्थानकांवर रॅम्प , ब्रेल फलक आणि सुधारित दिशादर्शक फलकांची तरतूद करून दिव्यांगांसाठी सुलभता वाढवण्यात आली आहे. 730 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असलेली रेल्वे जनजागृती मोहीम राबवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news