

रायगड ः नगरपालिका निवडणूकीसाठी अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लाखो रुपयांची बंडले गोळा केली आणि नगरपालिका निवडणूकात वाटली, असा आरोप विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी व्हीडिओ दाखवून केला. त्याला आमदार महेंद्र दळवी यांनी उत्तर देताना हा व्हीडीओ मॉर्फ केलेला आहे आणि त्यामागे रायगडचेच मोठे नेते आहेत, असे सांगत आरोप सिद्ध करा मी आमदारकीचा राजीनामा देतो, असे आव्हान दिले.
आमदार दळवी यांनी दिले आहे. त्यांचा मोठे नेते या आरोपा मागे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे अंगुलिनिर्देश असल्याने या आरोपावरुन राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष आणखी तिव्र झाल्याचे पहायला मिळाले. नगरपालिका निवडणूकीत शिवसेनेने 3 हजार रुपये वाटल्याचा आरोप एका बाजूला होत आहे तर दुसऱ्या बाजूला आरोपामागे खासदार सुनील तटकरे असल्याचे सांगत दानवेंना व्हीडिओ त्यांनीच पुरवले, असा थेट आरोप शिंदे शिवसेनकडून होत आहेत.
यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरुन सुरु झालेला संघर्ष या आरोपामुळे आणखी तिव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबादास दानवे यांच्या आरोपांशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण खा.सुनील तटकरे यांनी दिले आहे. दरम्यान अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचे शिवसैनिकांनी रायगडमध्ये दहन केले. तर विरोधी पक्षाने अलिबागमधील नोटा, मालवणमधील नोटा हा सत्तारुढ पक्षाचा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांनी रोकड बाळगायची नाही असे सांगूनही, त्यांच्या पक्षाकडे आणी मित्र पक्षांकडे एवढ्या नोटा कशा येतात असा सवाल केला आहे. नोटांच्या बंडलांवरुन मालवण मध्ये भाजपा आणि अलिबागमध्ये शिवसेना टार्गेटवर आले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडल फेको तमाशा देखो, हे मिंधेंच राजकारण चव्हाट्यावर आल्याचे म्हटले आहे. या सर्व आरोपांमुळे रायगडचे राजकारण आणखीनच तापले आहे.