पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणेजवळ दरड कोसळली

पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणेजवळ दरड कोसळली
Published on
Updated on

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : पोलादपूर – महाबळेश्वर राज्य मार्गावर कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. तर पायटा गावाजवळ एक झाड रस्त्यावर झुकल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे.

जिल्ह्यात आजपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड, मातीचा ओसरा खाली आला. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. पोलादपूर आपत्ती नियंत्रण कक्ष आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या पथकाने माती बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

पोलादपूर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मागील २४ तासांत पोलादपूर तालुक्यात ४१ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news