रायगड : रोह्यात जोरदार पाऊस; शेतकरी सुखावला, भातशेतीला पोषक | पुढारी

रायगड : रोह्यात जोरदार पाऊस; शेतकरी सुखावला, भातशेतीला पोषक

रायगड ; रोहे महादेव सरसंबे रोहा शहरासह ग्रामीण भागात आज (शुक्रवार) पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेली पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱी वर्गात चिंता व्यक्त केली जात होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात वर्तविला होता. अखेर हवामान खात्याच्या पावसाचा अंदाज खरा ठरला असून, शुक्रवारी रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळ पासुनच पावसाने सुरुवात केली आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातशेतीला हा पाऊस पोषक असल्याने शेतातील पाणी कमी होत असतानाच आता पडत असलेल्‍या या पावसाने पिकांसाठी पुन्हा पाणी उपलब्ध झाले आहे.

रोहा तालुक्यात (गुरुवारी) सकाळपासुन पावसाने सुरुवात केल्यानंतर दिवसभर रिपरिप चालु होती. पावसाच्या हजेरीने गोविंदा पथकात उत्साह दिसून आला. शुक्रवारी पावसाने सकाळ पासूनच सुरुवात केल्याने बळीराजाकडून समाधान व्यक्‍त होत आहे. पाऊस पडल्याने भातशेती बहरणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button