पनवेल रेल्वे स्थानक परिसरात मालगाडी घसरली

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात मालगाडी घसरली
Published on
Updated on

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल रेल्वे स्थनाकात जेएसडब्ल्यू कंपनीचा माल घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून खाली घसरली. ही  घटना आज (दि. ३०) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. ही ट्रेन पनवेलहून यूपीकडे निघाली होती.  ही मालगाडी घसरल्याने रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले आहे. यात गार्ड किरकोळ जखमी झाला आहे. रत्नेस सिंग असे या गार्ड चे नाव आहे.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मालगाडीचे 5 बोगी रुळावरून खाली उतरल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. जवळपास 5 ते 6 पॅसेंजर एक्सप्रेस ला विलंब होणार आहे. तर गोरखपूर एक्सप्रेस जागेवर थांबवण्यात आली होती.

या मालगाडीचे मागच्या 5 बोगी ट्रक वरून घसरून पलटी झाल्या. त्यासोबत ब्रेक व्हॅनदेखील रुळावरून खाली उरतली. त्या ब्रेक व्हॅनमध्ये असलेला गार्ड रत्नेस सिंग जखमी झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. 6 ते 7 तास काम सुरू राहील. मालगाडी घसरल्यानंतर 100 हून अधिक स्लीपर तुटल्या होत्या, स्लीपरच्या सळ्या बाहेर दिसून येत होत्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 पॅसेंजर वाहतुकीवर परिणाम

मंगला एक्सप्रेस, दिवा रोहा एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गोरखपूर एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसला विलंब होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती स्टेशन मास्तर यांनी दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news