रायगड : कुणबी म्हणून नको मराठा म्हणून आरक्षण मिळावे; क्षत्रिय मराठा समाजाची मागणी | पुढारी

रायगड : कुणबी म्हणून नको मराठा म्हणून आरक्षण मिळावे; क्षत्रिय मराठा समाजाची मागणी

महाड, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण कुणबी म्हणून नव्हे तर मराठा म्हणूनच द्यावे, अशी आग्रही मागणी कोकणातील क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. महाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी राजन घाग बोलत होते.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. एकीकडे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावे, याकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत.

महाड शासकीय विश्रामगृह येथे क्षत्रिय मराठा समाजाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण न देता मराठा आरक्षण मिळावे, अशी मागणी क्षत्रिय मराठा समाजाने एकमुखाने केली आहे.

तसेच १७ जानेवारीरोजी चिपळूण येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. यावेळी प्रभाकर महामुणकर, शेखर पालांडे, रवींद्र मोरे, बापू दळवी, सुधीर भोसले, अक्षय भोसले, तेजस भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button