Raigad News : आठ तासानंतरही बेपत्ता कामगारांचा शोध सुरू: एनडीआरएफच्या पथकाला पाचारण | पुढारी

Raigad News : आठ तासानंतरही बेपत्ता कामगारांचा शोध सुरू: एनडीआरएफच्या पथकाला पाचारण

श्रीकृष्ण द बाळ

महाड: महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रात असलेल्या कंपनीत झालेल्या स्फोटात व वायू गळतीमध्ये सुमारे ११ कामगार बेपत्ता असल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली आहे. ही घटना आज (दि.३) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. Raigad News

तसेच पाच कामगारांवर एम एम ए रुग्णालय व महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दुर्घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात स्थानिक यंत्रणेला यश झाले नव्हते. Raigad News

Raigad News : आठ तासानंतरही बेपत्ता कामगारांचा तपास सुरूच, आयपीसीएलचे पथक परत फिरले

बेपत्ता ११ कामगारांचा तपास आठ तासानंतरही करण्यात यंत्रणांना अपयश आले असून यासंदर्भात आयपीसीएल कंपनीचे आलेले पथक परत फिरले आहे. आता सायंकाळी उशिरा पुणे येथील एनडीआरएफ च्या पथकाला हेलिकॉप्टरद्वारे पाचारण केल्याची माहिती महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना दिली.

संबंधित बातम्या

या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले की, दुपारपासून सुरू असलेले यंत्रणांचे प्रयत्न संबंधित ठिकाणी पोहोचण्यास आलेल्या अनेक समस्यांमुळे यशस्वी झाले नसून इंडिया रेप च्या विशेष पथकाला पाचारण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दुर्घटनेचे वृत्त समजताच रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे घटनास्थळी दाखल झाले. पालकमंत्रीदेखील रात्री उशिरापर्यंत पोचणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button