

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: मुंबई – पुणे महामार्गावर वाहनचालकांना थांबवून त्यांना मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले. अवघ्या १५ दिवसांत दुसऱ्या टोळीला अटक केली आहे.
पनवेल जवळील पुणे- मुंबई एक्सप्रेसवे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट मार्गावर एका महिन्यात दोन लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी आरोपी स्वप्नील वाघमारे (रा.ढोणेवाडी), प्रवीण पवार (वय २०, रा. ढोणेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन असा १५ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत यांनी केली.
हेही वाचा