रायगड : रोहे महादेव सरसंबे रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. रायगड पाटबंधारे विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील २८ धरणापैकी २१ धरणे १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यातील पंधरा धरणातून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रात ९६.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, याच धरणात गेल्यावर्षी २०२२ मध्ये ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
जिल्ह्यातील २८ धरणापैकी २१ धरणे १०० टक्के भरलेली आहेत. उर्वरित धरणांमध्ये ४ धरणात ९० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वात कमी उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहिल्यास यामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू) पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध (पाण्याचा विसर्ग सुरू) सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध (पाण्याचा विसर्ग सुरू) घोटवडे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ) ढोकशेत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), कवेळे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरु ), उन्हेरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ) रानीवली धरण क्षेत्रात ७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ) संदेरी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू)
महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोथुर्डे क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ) कलोते मोकाशी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू) डोणवत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ) बामणोली धरण क्षेत्रात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात सर्वात कमी ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.