रायगड: विन्हेरे रेल्वे स्थानकावर ८ तासांपासून मस्त्यगंधा एक्सप्रेस खोळंबली | पुढारी

रायगड: विन्हेरे रेल्वे स्थानकावर ८ तासांपासून मस्त्यगंधा एक्सप्रेस खोळंबली

विराज पाटील

विन्हेरे, पनवेल रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेच्या गाड्या खोळंबल्या आहेत. पनवेल रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील विन्हेरे रेल्वे स्थानकावर आज (दि.१) मत्स्यगंधा एक्सप्रेस जवळपास आठ तासांपासून खोळंबली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

सकाळी 6 वाजल्यापासून प्रवाशी तिष्ठत बसले आहेत. जवळपास सहा तासांपासून या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. अनेक प्रवाशांची उपासमार झाली. सुमारे दीड ते दोन हजार प्रवासी अडकून पडले आहेत. स्थानिक नागरिक आणि  सेवाभावी संघटनांनी प्रवाशांसाठी पाणी, बिस्कीट, नाष्ट्याची व्यवस्था केली. तर विन्हेरे रेल्वे प्रशासनाने पाण्याची तसेच लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली. पनवेल मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बससह खासगी वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, ही एक्सप्रेस रद्द झाली नसून पुढील सूचना आल्यानंतर मार्गस्थ होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा 

 

Back to top button