रायगड: रोहा येथे लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड | पुढारी

रायगड: रोहा येथे लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

रोहे, पुढारी वृत्तसेवा : रोहा शहरातील श्रीराम लॉजवर वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. रोहा पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी तीन महिला आढळून आल्या. यासह दोन ग्राहक व मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

रोहा शहरातील वाढलेले अनैतिक धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. रोह्यात श्रीराम लॉजवर वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी एक महिन्यापासून पाळत ठेवत सापळा रचला होता. पोलिसांनी बनावट ग्राहक खातरजमा करण्यासाठी लॉजवर शुक्रवारी रात्री पाठवले होते. यावेळी तिथे मुंबईतील दोन ३९ वर्षीय नाशिकमधील एक २९ वर्षीय महिला आढळून आली. या प्रकरणात लॉज चालविणारा नागोठणे येथील एका आरोपीला अटक केले आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहे.

रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम लॉजवर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही एक महिना पासून पाळत ठेवली होती. शुक्रवारी त्या ठिकाणी छापा टाकला असता लॉजचा मॅनेजर, तीन महिला व दोन ग्राहक आढळून आले. दोन पंच व एक डमी कस्टमर तयार करून सापळा रचला असता सदर मॅनेजर हा पैसे स्वीकारताना आढळून आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून या संबंधित अधिक तपास सुरू आहे.
– प्रमोद बाबर, रोहा पोलीस निरीक्षक

हेही वाचा 

Back to top button