रायगड : रोह्यात मुसळधार पाऊस; मार्गावर ठिकठिकाणी पाणी | पुढारी

रायगड : रोह्यात मुसळधार पाऊस; मार्गावर ठिकठिकाणी पाणी

रोहे; पुढारी वृत्तसेवा : रोहा शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी (दि.२१) मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नदी-नाले तुरुंग भरून वाहू लागले आहेत. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात शुक्रवारी शाळा सोडण्यात आल्या. गुरुवारी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाने जोरदार रहात मोठ्या प्रमाणात बरसला आहे त्यामुळे कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत आहे.

रोहा तालुक्यात मंगळवारी (दि.१७) मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी (दि.२०) काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. परंतु, शुक्रवारी मात्र रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर, दुसरीकडे मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळा लवकर सोडण्यात आल्या.

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर ते निवी दरम्यान कालव्यातून पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे. दुसरीकडे कालव्यातून बाहेर आलेले पाणी शेतांमध्ये घुसले आहे. यामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

डोंगर माथ्यावरून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले बंद करण्यात आल्याने पाणी थेट कालव्यात जात आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याव येत आहे. पाटबंधारे विभागाने कालव्याची दुरुस्ती करताना डोंगर माथ्यावरून येणारे नाले प्रवाहित करण्याची आवश्यकता होती. परंतु तसं न केल्याने ते पाणी कालव्यात येवून पाणी रस्त्यावर येत आहे. याचा फटका गेली कित्येक वर्ष भुवनेश्वर व वरसे गावांना होत आहे. पाटबंधारे विभागाने डोंगर माथ्यावरून येत असलेल्या पाण्याचे नाले पूर्वीप्रमाणे करणे आवश्यक आहे तरच ही समस्या सुटेल.

– हेमंत कांबळे, माजी सभापती रोहा पंचायत समिती

हेही वाचा;

Back to top button