रायगड : गोवंशाची कत्तल करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

रायगड : गोवंशाची कत्तल करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलादपूर; पुढारी प्रतिनिधी: पोलादपूर तालुक्यातील वावे येथे एका नर जातीच्या गोवंशाची कत्तल केल्याची घटना रविवारी (दि.१९) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील तिघाही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार नरवीर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी उघडकीस आणला आहे.

याबाबतची माहिती अशी पोलादपूर तालुक्यातील नरवीर रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व त्यांचे सहकारी दिनेश दरेकर, राहुल जाधव, सुमित दरेकर, जयेश जगताप, सागर साळुंखे, दीपक शिंदे ,उमेश पालकर, प्रतीक मोहिते यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, आज (रविवारी) सकाळी धाड टाकली. विक्रीसाठी या गोवंशाची कत्तल केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वावे मोहल्ला येथील अब्दुल करीम अलीमिया तांबे , मोहम्मद अब्दुल मिया तांबे, फयाझ इस्माईल काझी या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद महाडिक, स्वप्निल कदम, इकबाल शेख हे करत आहेत.

मराठीत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन (पाहा व्हिडिओ)

National Geographic’s ‘Pictures of the Year’ Contest : भारतीय वंशाच्या कार्तिक सुब्रमण्यमने नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा जिंकली

Back to top button