National Geographic’s ‘Pictures of the Year’ Contest : भारतीय वंशाच्या कार्तिक सुब्रमण्यमने नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा जिंकली | पुढारी

National Geographic's 'Pictures of the Year' Contest : भारतीय वंशाच्या कार्तिक सुब्रमण्यमने नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा जिंकली

पुढारी ऑनलाइन डेस्क : National Geographic’s ‘Pictures of the Year’ Contest : नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा 2023 भारतीय वंशाच्या कार्तिक सुब्रमण्यमने जिंकली. 5000 छायाचित्रांना मागे टाकत कार्तिकने काढलेल्या छायाचित्राने अव्वल स्थान पटकावले आहे. कार्तिक सुब्रमण्यम यांनी त्यांच्या छायाचित्राला ‘डान्स ऑफ द ईगल्स’, असे नाव दिले आहे.

National Geographic’s ‘Pictures of the Year’ Contest : पुरस्कारानंतर कार्तिक यांनी म्हटले आहे की, दरवर्षी नोव्हेंबरमध्ये शेकडो बाल्ड गरुड हेन्स हे अलास्का जवळील चिलकट बाल्ड ईगल प्रिझर्व येथे सॅलमनची मेजवाणी करण्यासाठी एकत्र येतात. मी त्यांचे फोटो काढण्यासाठी गेल्या दोन नोव्हेंबरमध्ये तिथे गेलो होतो.

ते पुढे म्हणाले, पुरस्कार विजेत्या चित्रात एक ब्लाड गरूड दुस-या ब्लाड गरुडाच्या झाडावरील पेर्च (पक्षी बसतो ती फांदी किंवा जागा) चोरण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे चिलकट बाल्ड ईगल यांचे किना-याचे सुंदर दृश्य मिळाले. या चित्राचे शीर्षक त्यांना आरआरआर मार्टिन यांच्या ‘अ डान्स विथ ड्रॅगन्स’ या लोकप्रिय कादंबरीवरून प्रेरित आहे. गरुडांच्या नमुन्यांचे आणि वागणुकीचे तासनतास निरीक्षण केल्यानंतर मला हे क्षण टिपण्यात मदत झाली, असे कार्तिक याने म्हटले आहे.

National Geographic’s ‘Pictures of the Year’ Contest : कार्तिक भारतीय वंशाचा कॅलिफोर्निया स्थित सॉफ्टवेअर अभियंता आहे. निसर्ग आणि जंगल छायाचित्रणाची आवड असल्याने त्याने आपला छंद जोपासण्यासाठी एक छंद म्हणून जंगल छायाचित्र कॅप्चर करण्यास सुरुवात केली. त्यांनी काढलेलेया अलास्का येथील चिलकट बाल्ड ईगल प्रिझर्व्ह येथे टिपलेल्या डान्स ऑफ द ईगल्स या चित्राला भव्य पारितोषिक मिळाले आहे. त्यांचे हे पारितोषिक मिळालेले छायाचित्र नॅशनल जिओग्राफिकच्या मे महिन्याच्या आवृत्तीचे कव्हर पेज असणार आहे. कार्तिकचे इन्साटाग्राम वन्यजीवांच्या छायाचित्रांनी भरलेले आहे. दरम्यान पुरस्कारानंतर त्यांच्या फोटोंचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हे ही वाचा :

Virat Kohli Record : विराट कोहली बनला सर्वात वेगवान 25 हजारी मनसबदार!

कोल्हापूर : गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन (व्हिडिओ)

Back to top button