रायगड : ऐकावं ते नवलंच! लाडवलीमध्ये जन्माला आले चार पायाचे कोंबडीचे पिल्लू | पुढारी

रायगड : ऐकावं ते नवलंच! लाडवलीमध्ये जन्माला आले चार पायाचे कोंबडीचे पिल्लू

नाते वार्ताहार; पुढारी वृत्तसेवा :  महाड तालुक्यातील लाडवली गावात निसर्गाची किमया पाहायला मिळाली असून लाडवली गावातील सिद्धेश संतोष शिंदे यांच्या कोंबडीने ४ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. यामुळे या चार पायाच्या कोंबडीच्या पिल्लाची गावभर चर्चा रंगली आहे.

सिद्धेश शिंदे यांच्या घरातील एका कोंबडीने उबवलेल्या अंड्यात एक चार पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे. निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी शिंदे यांच्या घराकडे बघ्यांची गर्दी वाढत आहे. सर्वसामान्य कोंबडीप्रमाणे या पिल्लाला दोन पंख, दोन डोळे, आणि चोच आहे पण नवल म्हणजे या कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय आहेत. यातील पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला दोन पाय आहेत. त्यामुळे या कोबडींच्या पिल्लाचे हे वेगळेपण पाहून शिंदेही आवाक झाले आहेत. अशा प्रकारच्या  घटना क्वचितच  घडत असतात.

     हेही वाचलंत का ?

Back to top button