पनवेल, पुढारी वृत्तसेवा : कामोठे सेक्टर 36 मधील नीलकंठ स्वीट मार्ट मधून जिलेबी विकत घेतलेल्या ग्राहकाला जिलेबीत अळ्या आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार 29 नोव्हेंबर रोजी समोर आला होता. या प्रकरणानंतर तक्रारदार यांनी अन्न औषध प्रशासनाला तक्रार देखील केली मात्र 4 दिवस उलटून गेल्या नंतर देखील कारवाई झाली नसल्याने अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईवर शंका घेतली जाऊ लागली आहे. अन्न औषध प्रशासनाने कारवाईचा आव आणून ढोगीपणा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या जाळ्यात अडकून पडली आहे.
कामोठे वसाहतीमधील रहिवाशी किरण पवार यांनी नीलकंठ स्वीट मार्ट मधून जिलेबी खरेदी केली. घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिले असता जिलेबीमध्ये आळ्या दिसून आल्या. दरम्यान, त्याच्या 4 वर्ष्याच्या मुलाने त्या बॉक्समधील जिलेबी खाल्ली होती. यानंतर पवार यांनी दुकानाकडे धाव घेत या प्रकरणाचा जाब त्यांनी दुकान मालक मयूर याना विचारला. त्या वेळी दुकान मालकाने या गोष्टीला नकार दिला. मात्र पवार यांनी दुकानात ठेवलेल्या अन्य जिलेबीची पाहणी केली. यावेळी दुकानातील जिलेबितध्ये आळ्या आढळल्या. यांनतर संतापलेल्या पवारांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मात्र हे प्रकरण अन्न औषध प्रशासनाशी संदर्भात असल्याची माहिती देण्यात आली आणि अन्न औषध प्रशासनाकडे जाण्याचा सल्ला देखील दिली. अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु त्यांनी आम्ही निवडणुकीच्या कामात आहोत असे सांगूत टाळाटाळ केली. दरम्यान, 8 तसानंतर अधिकारी वर्ग पाठवून कारवाईचा दिखावा करण्यास सुरुवात केली. 29 तारखेला आलेल्या अधिकाऱ्यांनी 4 दिवस उलटून गेल्यानंतर देखील कारवाई न केल्याने तक्रारदार यांनी कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.
4 वर्षीय मुलाला विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या जिलेबीमध्ये चक्क आळ्या आढळून आल्या होत्या. सध्या या चिमुकल्यावर त्याच्या राहत्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. जिलेबी खाल्ल्यानंतर त्या चिमुकल्याला जुलाब, उलट्या आणि पोटात दुकण्यास सुरवात झाली आहे.
ग्राहकांनी आणलेल्या जिलेबीमध्ये आळ्या दिसून येत होत्या. ते आम्हाला पोलीस ठाण्यातदेखील घेऊन गेले. मात्र आमच्या दुकानात असलेल्या जिलेबी होत्या की नाही हे मला सांगता येणार नाही, असे दुकान मालकांने सांगितले.
आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे. त्याच्या गोदामातील नमुने देखील घेतले आहे. फक्त अधिकारी कामात व्यस्त असल्याने कामोठ्यात पोहचण्यासाठी विलंब झाला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न औषध प्रश्नासन सहाय्यक आयुक्तांनी माहिती दिली.
हेही वाचा